Karuna Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल, तोच मोठा विजय !

Karuna Munde said I am tired of complaining to Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून मी थकले

करुणा मुंडे यांचा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधील लढा यशस्वी होताना दिसतोय. माध्यमांसमोर बोलताना करुणा यांना काल अश्रू अनावर झाले होते. धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला फसवून लग्न करणाऱ्याला धनंडय मुंडे २० कोटी रुपये देणार होते, आसा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. अशात धनंजय मुंडेंची आमदारकीही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माध्यमांसमोर काल (५ एप्रिल) बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून – करून मी थकले. तीन वर्षांपासून माझ्यावर अत्याचार झाले. तक्रारींच्या प्रतींची थप्पी जमा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. तुमचे मंत्री कसे अन्याय करत आहेत, हेसुद्धा निवेदनातून मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगितले. मंत्र्याची बायको असूनही मला न्याय मिळू शकत नसेल तर मग न्याय मिळणार कुणाला, असा सवालही करुणा मुंडे यांनी केला.

Chandrashekhar Bawankule : सपकाळांनी आपली उंची तपासावी आणि मगच..

हा छोटा विजय..
पाच – सहा दिवसांपूर्वी बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडेही तक्रार केलेली आहे. त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. सध्या मिळालेले यश खुप मोठे नाही. हा छोटा विजय आहे. ज्या दिवशी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल, तो माझा मोठा विजय असेल आणि त्याची आमदारकी नक्कीच रद्द होईल अशी खात्री असल्याचे त्या म्हणाल्या.

त्याचे दलाल सर्व पोहोचवत होते..
त्याने माझ्याशी वैदीक पद्धतीने लग्न केले. ते स्वीकृती पत्र मी न्यायालयात सादर केले. जो मला प्रेमात फसवून लग्न करेल, त्याला २० कोटी देणार असल्याचे धनंजय मुंडेच्या दलालांनी जाहिर केले होते. तेजस ठक्कर, वाल्मीक कराडसारखे दलाल त्याला मुली आणि दारू पोहोचवत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. म्हणून तो आज घरी बसून आहे आणि मला यश मिळत आहे, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले. २७ वर्ष मी त्याला सांभाळले, पण त्याने मला रस्त्यावर आणले, असेही त्या म्हणाल्या.

Vidarbha Farmers : अवकाळी पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे!

धनंजय मुंडेंसोबत माझे जॉईन्ट अकाऊंट आहे. माझ्याकडे त्याचे सर्व रेकॉर्डींग आहेत. कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन मला दुबईत पाठवण्याचा त्याचा प्लान होता. पण मी त्याला दाद दिली नाही. मी कायदेशीर लढाई लढत राहणार आहे. माझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली. त्यांना काय करायचे आहे, ते खुशाल करावे. माझ्याजवळ सर्व पुरावे आहेत. ज्याच्याजवळ पुरावे नाही, तो आपल्या खोलीत बसून हा तमाशा पाहात असल्याचेही करुणा मुंडे म्हणाल्या.