Yavatmal Airport taken away from Reliance : अंबानींच्या कंपनीने पंधरा वर्षांत काहीच केले नाही, आता MIDC कडे जबाबदारी
Yavatmal रिलायन्ससारख्या मोठ्या कंपनीकडे यवतमाळसह राज्यातील पाच विमानतळं विकसित करण्याची जबाबदारी होती. पण पंधरा वर्षांमध्ये अनिल अंबानींच्या कंपनीने काहीच केले नाही. अखेर राज्य सरकारने ही विमानतळं अंबानींकडून काढून घेतली आणि आता MIDC कडे हस्तांतरित केली आहेत. रिलायन्स कंपनीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे आता तरी विमानतळांचं भलं होईल, अशी आशा केली जात आहे.
यवतमाळ, नांदेड, बारामती, लातूर व धाराशिव अशा पाच ठिकाणांवर विमानतळं प्रस्तावित होती. पंधरा वर्षांपूर्वी अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीकडे या विमानतळांची जबाबदारी देण्यात आली. परंतु, दरम्यानच्या काळात नव्याने प्रस्तावित विमानतळं चांगली झाली आणि तेथून सेवाही सुरू झाली. मात्र, या पाच विमानतळांवरून पाखरूही उडालं नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis व उद्योगमंत्री उदय सामंत Uday Samant यांनी एमआयडीसीवर विश्वास टाकला आहे.
Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत
अलीकडेच एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिलायन्सकडून या विमानतळांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. बी. दाभेराव, प्रादेशिक अधिकारी स्नेहा पिंपरीकर-नंद, प्रमुख भूमापक जी. एस. बारसकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जागेचे मोजमाप करून पंचनामा झाल्यानंतर एमआयडीसीने विमानतळाचा ताबा घेतला.
Water shortage : मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, डझनावर आमदार; तरी नळाला नाही धार!
विस्ताराच्या अपेक्षेने राज्य सरकारने यवतमाळचे जवाहरलाल दर्डा विमानतळ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे दिले होते. परंतु सुरू असलेले विमानतळ रिलायन्सने बंद पाडले. अशीच अवस्था राज्यातील इतर चार विमानतळांचीही झाली. या प्रकारामुळे औद्योगिकरणालाही मोठी खीळ बसली. आता एमआयडीसीच्या माध्यमातून विकासाचा मार्ग प्रशस्त होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.