Breaking

Lonar Lake : शंभर शाळा लोणार सरोवराच्या भेटीला !

A hundred schools from across the state visited Lonar Lake : सुविधांची वानवा, बसेस नाहीत; प्रशासनाचे दुर्लक्ष

Buldhana Lonar Lake जगप्रसिद्ध लाेणार सराेवराची शालेय विद्यार्थ्यांना भुरळ पडली आहे. गेल्या महिनाभरातच राज्यातील १०० पेक्षा जास्त शाळा लोणार सरोवराच्या भेटीला आल्या. विशेष म्हणजे याठिकाणी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी लोणार सरोवराचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचं पर्यटन केंद्र म्हणून लोणारकडे बघितलं जातं. राज्यभरातील शाळांच्या भेटीने त्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

१ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यभरातून १०० राहून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली. यासंदर्भातील माहिती पुरातत्त्व विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच परिसर ज्ञान प्राप्त व्हावे. निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती व्हावी. विद्यार्थ्यांना गडकिल्ले पाहता यावेत. इतिहास, भूगोल कळावा या दृष्टिकोनातून शालेय सहलींवर भर असतो. खासगी तसेच शासकीय शाळांकडून हिवाळ्यात प्रामुख्याने सहलींचे आयोजन करण्यात येते. गेल्या एक महिन्यात लोणार सरोवर पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातून प्रामुख्याने या सहली आल्या आहेत.

Madhuri Misal, Indranil Naik : माधुरी मिसाळ की इंद्रनील नाईक?

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांत प्रामुख्याने या सहली येतात. जगप्रसिद्ध लाेणार सराेवराची राज्यातील विद्यार्थ्यांना भुरळ पडल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षीही सराेवराला राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी भेट देवून पाहणी केली हाेती. अनेक देश विदेशातील पर्यटकही लाेणार सराेवराला भेट देवून पाहणी करतात.

माहिती कोण देणार?
लोणार येथे सरोवराशी संबंधित सर्वंकष माहिती देणारे केंद्रच नाही. त्यामुळे सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्यांचा भ्रमनिरास होतो. थोडीफार जुजबी माहिती दिली जाते. त्यामुळे सरोवराच्या संदर्भात सर्वंकष माहिती देणारे केंद्र येथे उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Dr. Pankaj Chande : राजकारणी लोकांनी जातींमध्ये विष पेरले

सुविधांचा अभाव
शालेय विद्यार्थी लाेणार सराेवरात आल्यानंतर त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच पर्यटकांनाही सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. अनेकवेळा सराेवराला भेट देण्यासाठी जात असताना बसेसच नसतात. त्यामुळे लाेणारसाठी बसेस उपलब्ध करून देण्याची गरज आहे.