Breaking

A new disease of cracks on hands : हाताला भेगा पडताय? घाबरण्याचे कारण नाही!

Relief from the Health Department that there is no infectious disease : आरोग्य विभागाचा दिलासा; संसर्गजन्य आजार नसल्याची माहिती

Buldhana मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख या गावामध्ये हात व पायाच्या तळव्यांवर भेगा पडणे, साल निघणे व खाज येणे अशी लक्षणे असलेल्या रूग्णांचे निदान एक्झामा (ईक्झामा/ पामोप्लांटर केराटोडर्मा/ पामोप्लांटर सोरायसिस) म्हणून करण्यात आले आहे. त्याचा संसर्ग एकमेकांमध्ये फैलावत नसल्याचा दिलासा जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिला आहे.

ग्रामस्थांनी घाबरून न देता योग्य वेळेवर जवळच्या शासकीय रूग्णालयाचा सल्ला व उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे.

Uddhav Thackeray Shiv Sena : जिल्हा परिषद शिक्षकांवरील निलंबनाचा प्रश्न चिघळला

१४ रूग्णांमध्ये एक्झामा आढळला
गेल्या १४ व १५ जून रोजी शेलगांव देशमुख येथे घरोघरी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान एकूण २० जणांमध्ये ही लक्षणे आढळली होती. त्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील साथरोग व सर्वेक्षण अधिकाऱ्यांचे एक पथक गावास भेट देऊन स्थितीचे निरीक्षण केले.

जिल्हा साथरोग व सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे व त्वचारोग तज्ञ डॉ. बालाजी आगट यांनी केलेल्या तपासणीत २० पैकी १४ रूग्णांमध्ये एक्झामा (ईक्झामा/ पामोप्लांटर केराटोडर्मा/ पामोप्लांटर सोरायसिस) असल्याचे आढळले. या रूग्णांमध्ये एक ते पाच वर्षांपूर्वीपासून ही समस्या असून त्यांच्यावर बुलडाणा व अकोला येथे योग्य उपचार सुरु आहेत.

या आजाराचा संसर्ग होत नाही
या आजारााचा पाण्याशी किंवा एकमेकांमध्ये संसर्गाचा कोणताही संबंध नसून, विविध प्रतिजनांमुळे किंवा बाह्य घटकांमुळे ही समस्या उद्भवू शकते, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. ही लक्षणे अधिक कालपर्यंत टिकू शकतात, परंतू एकमेकांमध्ये पसरत नाहीत.

Amravati Municipal Corporation : मुसळधार पाऊस कोसळला तर अर्धे अमरावती पाण्याखाली जाणार!

नागरिकांनी घाबरू नये. अशी लक्षणे आढळ्यास जवळच्या शासकीय रूग्णालयास भेट देऊन योग्य उपचार व सल्ला घ्यावा, औषधोपचार व पथ्यांचे पालन करावे, असें आवाहन डॉ. अमोल गिते यांनी केले आहे.