Subdivisional Engineer of Public Works Department suspended : बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता निलंबित
Gadchiroli : बारमध्ये बसून शासकीय फायलींवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी उपविभागातील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले.
हे प्रकरण 28 जुलै रोजी समोर आले होते. नागपूरमधील मनीषनगर येथील एका बारमध्ये तीन व्यक्ती ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेल्या फायलींसह बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यातील एक अधिकारी बारमध्ये मद्यपान करत फायलींवर स्वाक्षऱ्या करत असल्याचे स्पष्ट दिसत होते. या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
Fuel discount for ST : सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ, वर्षाला 12 कोटी वाचणार !
प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. बारमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित अधिकाऱ्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अभियंत्यांनी देवानंद सोनटक्के यांचे तातडीने निलंबन केले.
Last day for E-KYC : तर ४.८८ लाख लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद!
दरम्यान, जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर आधीपासूनच प्रश्न उपस्थित होत असताना, अधिकाऱ्याने शासकीय दस्तावेजांसोबत बारमध्ये असा प्रकार केल्याने प्रशासन आणि जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यावर पुढील तपास व कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
____