Be a smart investor : राहूल केळापुरे यांचे आवाहन; ‘अॅडव्हान्टेज विदर्भ-2025’मध्ये सेबीवर चर्चासत्र
Nagpur : गुंतवणुकीची सुरक्षा, पडताळणी आणि संपूर्ण विचारांती गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा. गुंतवणुकीपूर्वी आपण कोणत्या स्तरावर गुंतवणूक करणार आहोत हे निश्चित करावे. एकूणच गुंतवणुकीचा स्मार्ट विचार करणे आज गरजेचे आहे, असं सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चे सहायक व्यवस्थापक प्रबंधक राहुल केळापुरे म्हणाले.
गुंतवणुकीतून त्यातून योग्य परतावा मिळविणे शक्य आहे का? तसेच आपली निधीची तरलता लक्षात घ्यावी. डिबेंचर, बाँड, म्युच्युअल फंड अशा सर्व क्षेत्रात गुंतवणूक केल्यास आपण स्मार्ट गंतवणूकदार होऊ शकू, असंही ते म्हणाले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित अॅडव्हान्टेज विदर्भ-2025 खासदार औद्योगिक महोत्सवात ते बोलत होते. ‘स्मार्ट इनव्हेस्टर कसे व्हावे?’ या विषयावर सेबीचे सत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सेबीच्या उपमहाप्रबंधक बालाकुमारी, एम. के. वेल्थचे भागीदार आशिष शर्मा, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सीए गिरीश देवधर, सीएमए मिलिंद अळशी, सीए वरुण विजयवर्गीय आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कोणतीही व्यक्ती आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी गुंतवणूक करते. त्यासाठी जाणीव ठेऊन आणि समजून उमजून गुंतवणूक करावी, असा सल्ला बालाकुमारी यांनी दिला. आशिष शर्मा यांनी गुंतवणूकदारांनी इक्विटी, सिक्युरीटी आदी क्षेत्रात गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला. यात सातत्याने तीन वर्षे गुंतवणूक केल्यास तोटा होण्याची संभावना नसते, असंही ते म्हणाले.
चर्चासत्राच्या अंतिम टप्प्यात सर्व उपस्थित मान्यवरांचा अध्यक्ष आशिष काळे यांच्या हस्ते रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी वरुण विजयवर्गीय यांनी प्रास्ताविकातून विषयाची माहिती दिली. संचालन निकेता खंगार यांनी केले.
Maharashtra Government : समृद्धी महामार्गावर एकाच रात्री तीन अपघात!
‘अपना’सोबत सामंजस्य करार
‘अपना’ या भारतातील अग्रगण्य नोकरी आणि व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) नागपूर द्वारे आयोजित केलेल्या ॲडव्हांटेज विदर्भ 2025 सह सामंजस्य करार केला. विदर्भातील रोजगाराच्या संधींना बळकटी देण्यासाठी आणि व्यवसायांना सक्षम बनवण्याच्या धोरणात्मक प्रयत्नांसाठी हे पाऊल उचलण्यात आले. या सामंजस्य करारावर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे व ‘Apna.co’ चे संस्थापक आणि सीईओ निर्मित पारीख व उपाध्यक्ष डॉ. प्रीत दीप सिंग यांनी स्वाक्षरी केली.