Rohit Pawars attack on decision of Committee of Ministers : मंत्री समितीच्या ‘त्या’ निर्णयावर रोहित पवारांचा हल्लाबोल!
Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा वापर ठरलेल्या उद्देशासाठीच झाला का, याची चौकशी साखर आयुक्तांकडून दोन महिन्यांत करण्यात येणार आहे.
या चौकशीत अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर हे संस्थेच्या नियामक मंडळावर असल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या चौकशीला राजकीय रंग चढला आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Investigation of ‘Vasantdada Sugar : शरद पवार अध्यक्ष असलेल्या ‘वसंतदादा शुगर’ची चौकशी !
रोहित पवार म्हणाले की, अनेक उदाहरणे आणि पुरावे आम्ही सरकारसमोर ठेवले आहेत, परंतु त्या प्रकरणांवर मुख्यमंत्री काहीच चौकशी लावत नाहीत. संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि हगवणे प्रकरणांमध्ये न्याय मिळत नाही, असे ते म्हणाले. व्हीएसआयच्या माध्यमातून आजवर शेती आणि सहकार क्षेत्रात अत्यंत चांगले काम झाले आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र भक्कम असण्यामागे व्हीएसआयचा मोठा वाटा आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजितदादांच्या सहभागामुळे या संस्थेने अनेक उपक्रम राबवले आहेत. या संस्थेत सर्व पक्षांचे लोक काम करतात, त्यामुळे पक्षभेदाचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवार म्हणाले की, कालच अमित शाह म्हणाले की आम्हाला कुबड्यांची गरज नाही. याआधी ठाण्याला टार्गेट केले गेले होते. आता अजितदादा व्हीएसआयमध्ये असल्यामुळे भाजपचा मोर्चा बारामतीकडे वळला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. हे हास्यास्पद आहे. चौकशी करायची असेल तर इतर विषयांवर करा. आम्ही अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत, पण त्यावर मात्र सरकार मौन बाळगते. नको त्या संस्थांवर चौकशी लावून राजकीय डाव खेळला जातो, असा आरोप त्यांनी केला.
Crime News : माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या घरात चोरी; सोनं आणि रोकड लंपास
ते पुढे म्हणाले की, व्हीएसआय ही एक ट्रस्ट संस्था आहे आणि आजवर केलेल्या कामाची सगळ्यांनीच प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा स्वतः या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधान कार्यालयाकडून संस्थेचा सखोल अभ्यास झाल्यानंतरच त्यांचा दौरा ठरला होता. मग आता अचानक या संस्थेविरुद्ध सरकार सक्रिय का झाले, हे समजत नाही. अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
Doctor suicide case : मृत्यूनंतरही फिंगर लॉक वापरून पुरावे डिलीट?
भाजपची वृत्ती वापरा आणि फेकून द्या अशीच आहे, असे टीकास्त्रही रोहित पवारांनी सोडले. त्यांनी म्हटले की, काल अमित शाह यांनी मुंबईत सांगितले की आम्हाला कुबड्यांची गरज नाही. कुबड्या म्हणजेच हे दोन पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोघांकडे ना लोक राहतील, ना पक्ष, अशी परिस्थिती निर्माण होईल, असे रोहित पवार म्हणाले.
____








