Breaking

Akola Politics : विधानसभा निवडणुकीतील गटबाजीवर तक्रारींचे राजकारण

Akola Municipal Corporation’s action awaited : पराभवाची खदखद, महापालिकेच्या कारवाईकडे अकोल्याचे लक्ष

Akola विधानसभा निवडणुकीतील पराभवाने अस्वस्थ झालेल्या एका पराभूत उमेदवाराने तक्रार दाखल केली आहे. प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवाराच्या अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या नगररचना विभागाकडे त्याने ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत हॉटेल्स, बिअर शॉप्स, बिअर बार्स आणि कॉटेजेस यांचा समावेश आहे.

यानंतर महापालिकेच्या दक्षिण आणि उत्तर झोन कार्यालयांशी संबंधित मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. मालकांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी वेळ मागितला आहे. परंतु, या प्रकरणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी वेगळेच राजकारण रंगताना दिसत आहे.

Export Policy of Mahayuti Government : अकोला जिल्ह्यातील डाळ व कापूस जाणार परदेशात !

या प्रकाराने विधानसभा निवडणुकीतील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आली आहे. निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयांविरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे मतविभाजन झाले. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला. गेल्या तीन दशकांपासून भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसने विजय मिळवला.

यामुळे भाजपचा पराभव पक्षातील बंडखोरांमुळे झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीमुळे निर्माण झालेल्या या प्रकरणाला कोणते राजकीय वळण मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेची कारवाई, तसेच या वादाचा पुढील परिणाम काय होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MLA Sajid Khan Pathan : महापालिकेतील गैरव्यवहारांची लवकरच पोलखोल

भाजपमधील दोन गटांचा परिणाम
अकोला जिल्ह्यात भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. त्यात एक गट आमदारांमध्ये सावरकर यांचा आहे. दुसरा गट भाजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा आहे. दोन्हीं गटातील राजकारणाचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसून आला होता. दोन्ही गटात टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे.