Breaking

Amravati Municipal Corporation मालमत्ता करापोटी भरलेले ३१ लाख फस्त!

Corruption of property tax worth Rs.31 lakh : कारवाई कधी होणार? करवसुली लिपिकांचा प्रताप

Amravati महानगरपालिकेच्या बडनेरा झोनमध्ये कार्यरत दोन करवसुुली लिपिकांनी ३१ लाख रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणी लेखापरीक्षण विभागाने तपासणी अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. ही बाब उघडकीस येऊन सहा महिने झाले. पण अद्याप महापालिका प्रशासनाकडून त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. केवळ या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करीत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

बडनेरा झोन कार्यालयात कर वसुुलीच्या रकमेत गडबड झाली. त्यानंतर सन २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३, २०२३-२४ अशा दोन प्रकारे महानगरपालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने तपासणी केली. स्वतंत्रपणे अहवाल सादर केला आहे. या अहवालात ‘फ्रॉड’ असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर आर्थिक फसवणुकीच्या अनुषंगाने ठोस कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Collector of Buldhana : शेतकऱ्यांनो, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’चा लाभ घ्या!

त्यात रोहित चव्हाण या लिपिकाकडून १९ लाख, तर गोपाल यादव यांच्याकडून १२ लाखांची वसुली करण्याचे अहवालातून नमूद आहे. एकीकडे प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने शंका उपस्थित होत आहे. तर मांगीलाल पटेल या कर्मचाऱ्याने कर वसुलीचा ३.५० लाखांचा भरणा केल्याची माहिती आहे. लेखापरीक्षकांच्या अहवालानंतरही दोषी करवसुली लिपिकांवर प्रशासन कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली नाही. त्यामुळे कोणत्या अदृश्य शक्तीचा दबाव आहे, हे एक कोडेच आहे.

करवसुली केली, पण ही रक्कम तिजोरीत जमा केली नाही, असे ऑडिटचा अहवाल सांगतो. यात महापालिकेची आर्थिक फसवणूक झाली आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, पण पुढे काहीच नाही, असा अफलातून प्रकार अलीकडे महानगरपालिकेत सुरू आहे.

Siddharth Kharat Sanjay Raimulkar कमाल आहे! एकाच कामाचे दोनवेळा भूमिपूजन

रक्कम वसूल करणार
बडनेरा झोनमधील कर वसुलीबाबत लेखापरीक्षण विभागाचा वस्तुनिष्ठ तपासणी अहवाल सादर झाला आहे. हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी उपायुक्त मेघना वासनकर यांच्याकडे पाठवला आहे. संबंधितांवर रक्कम वसुलीचे आदेश होते. पुढे काय झाले, ते बघावे लागेल. त्यात काही कर्मचारी निलंबितदेखील झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.