Use of power to create social divide : माजी गृहमंत्र्यांचे सरकारवर गंभीर आरोप,
Amravati महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सरकार औरंगजेबाची कबर, छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘छावा’ सिनेमासारखे विषय पुढे आणत आहे. काही संघटनांच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा स्पष्ट गैरवापर आहे, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
अनिल देशमुख यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या जनजागरण अभियानाच्या अनुषंगाने ही परिषद घेण्यात आली. देशमुख यांनी राज्यातील वाढती महागाई, बेकारी, शेतमालाला मिळणारा कमी भाव, महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर असल्याचे नमूद केले. त्यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचेही सांगितले.
Randhir Sawarkar : सपकाळांची विधानं काँग्रेसच्या आकांना खूश करण्यासाठी!
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जनजागरण अभियान सुरू केले आहे. अमरावतीनंतर अकोला जिल्ह्यात बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले शंकरपट स्पर्धेला राजाश्रय देण्याची गरज!
नागपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया
नागपूर शहरात सध्या घडत असलेल्या दंगल सदृश घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या नागपूर शहराची ही संस्कृती नाही. अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा जपणाऱ्या नागपुरात शांतता व स्थैर्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणून सर्वांनी संयम बाळगण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.