Breaking

Anti-Drug Awareness Week : ऑपरेशन थंडरअंतर्गत ७३० अटकेत, तर आठ कोटींचे अंमली पदार्थ जप्त !

730 arrested under Operation Thunder, drugs worth Rs 8 crore seized, information of Nagpur Police Commissioner Ravindra Singhal : आजपासून २६ जूनपर्यंत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात ड्रग्जची विक्री फोफावतेय. नागपुराचा ‘उडता पंजाब’ होत आहे, असे आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आले. यादरम्यान पोलिस प्रशासन आपले काम करत राहिले. अशात नागपुरचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी एक चांगली बातमी दिली आहे. नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत गेल्या दीड वर्षात तब्बल आठ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर ७३० जणांना अटक करण्याती आली आहे.

यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल म्हणाले, एकूण ५४० प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक संबंधित गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नागपूर शहर ड्रग्ज फ्री करण्याच्या उद्देशाने आजपासून ते २६ जूनपर्यंत ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. ‘एकत्र येऊया – नशामुक्त समाज घडवूया’, या घोषवाक्यासह नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच विविध खेळांचे खेळाडू यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडूंना दिलासा नाहीच; अध्यक्षपदाच्या अपात्रतेवरील निर्णय २४ जूनला

आपरेशन थंडर राबवताना अंमली पदार्थ विरोध पथकाने गेल्या वर्षभरात आठ कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या टीमने नियोजनबद्ध पद्धतीने सापळे रचत सर्व कारवाया केल्या आहेत, असेही रविंद्र सिंगल यांनी सांगितले. या कारवाईनंतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे.

Chandrashekar Bawankule: ‘ते’ भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता

कारवाईमध्ये ९४ प्रकरणांमध्ये ६ कोटी ८१ लाख रुपये किमतीची सहा किलो एमडी जप्त करून १८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. १०० प्रकरणांत १ कोटी ६६ लाख रुपयांचा गांजा जप्त करून १३२ आरोपींना अटक. एका प्रकरणात १० लाख २८ हजार रुपये किमतीचा डोडा जप्त. ६ लाख १८ हजार रुपये किमतीचे अफीम जप्त. १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ७० ग्रॅम चरस कारवाईमध्ये जप्त करण्यात आले आहे.