If Shiv Sena chief Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray had already compromised, this time would not have come : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले तरी अॅडजेस्ट होतील, असं वाटत नाही
Nagpur : शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. मराठीच्या मुद्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधुंच्या एकीचा धसका घेत महायुती सरकारने हिंदी भाषा सक्ती थांबवली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळे समीकरण आकार घेऊ लागले. यावर क्रिया – प्रतिक्रिया आल्या, चर्चा झडल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आता ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर शंका उपस्थित केली आहे.
नागपुरात काल (२९ जुलै) पत्रकारांशी बोलताना आशिष जयस्वाल यांनी ठाकरे बंधुंमध्ये अॅडजेस्टमेंट होणार नाही, असे म्हटले आहे. ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या फक्त चर्चाच आहेत. अजूनही ते एकत्र आलेले नाहीत. दोन भावांनी यापूर्वीच अॅडजेस्टमेंटची भूमिका घेतली असती, तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती. एखाद्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांच्यामध्ये अॅडजेस्टमेंट होईल, असे वाटत नाही, अशी शंका जयस्वाल यांनी व्यक्त केली.
Chandrashekhar Bawankule : नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी सीएसआरचा निधी !
आशिष जयस्वाल हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील वजनदार नेते आहेत. येथे शिवसेनेला त्यांनीच खाते उघडून दिले होते. ते पाच टर्मचे आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात ते खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष होते. शिवसेनेत फूट पडली तेव्हा ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्याचे फळ त्यांना राज्यमंत्रिपदाच्या स्वरुपात मिळाले. एकसंघ शिवसेनेच्या कार्यपद्धतीचा जवळपास २५ वर्षांचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेली शंका गांभीर्याने घेतली जात आहे.