Shivsena minister attacks on Sharad Pawar for statement on Praveen Gaikwad case : प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याला राजकीय वळण देऊ नये
Nagpur : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावरून जी टिका केली, ती त्यांना शोभणारी नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला हे शोभत नाही, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हे अपेक्षीत नव्हतं, असेही जयस्वाल म्हणाले.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरही टिका केली आहे. यासंदर्भात ते म्हणाले, निकृष्ठ जेवण मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली. हे वर्तन निश्चितच योग्य नाही. मात्र काही वेळा लोकांचा राग अनावर होतो आणि भावनेच्या भरात अशी कृती घडते. संजय गायकवाड यांचा राग अनावर झाल्यानेच त्यांच्याकडून हे कृत्य घडले. यावर वरिष्ठ नेत्यांनी आपली भुमिका स्पष्ट केलेली आहे.
Sumit Wankhede : माओवाद्यांमुळेच लोकसभेत त्यांचे जास्त खासदार निवडून आले !
शिवसेना सर्वसामान्य माणसांसाठी काम करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा ओढा आमच्या पक्षाकडे वाढत चालला आहे. आगामी काळात आणखी अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करतील. मुंबईत यासंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. आगामी पक्षप्रवेशासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पुढील काळात आणखी कोणाचे प्रवेश होतील, हेसुद्धा या बैठकीत ठरवण्यात आल्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.