Breaking

Ashish Jaiswal : गोगावले पालकमंत्री व्हावे, ही मागणी योग्यच !

We support Uday Samant’s statement said Shiv Sena Minister : उदय सामंत यांच्या म्हणण्याला आमचा पाठिंबा

Nagpur : मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावे, अशी मागणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यांनी केलेली मागणी योग्यच आहे, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे. यासंदर्भात जयस्वाल यांनी आज (५ ऑगस्ट) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गोगावले ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांच्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे उदय सामंत यांच्या मागणीला आमचा पाठींबा आहे.

कोण कोणाच्या पक्षातील लोकांची पळवापळवी करत आहे, यासंदर्भात मला काही माहिती नाही. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकमेकांना विश्वासात घेऊन आणि एकमेकांची मने न दुखावता महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी मिळून काम करावे. एकमेकांची मने दुखावतील, अशी कुठलीही कृती महायुतीमधील कोणत्याही पक्षाने करू नये, असे राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले.

Local body Elections 2025 : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचा बिगुल दिवाळीनंतर !

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत विचारले असता, ओबीसी मंत्रालय कधी स्थापन झाले, याची सर्वांनाच कल्पना आहे. ओबीसी आरक्षण कुणी काढून घेतले आणि कुणी मिळवून दिले, हेही माहिती आहे. न्यायालयात ओबीसींची योग्य बाजू कुणी मांडली की, ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला, हे सुद्धा जनतेला माहिती आहे. जनता सुज्ञ आहे, ती काय ते ठरवेल.

Cabinet meeting : स्टार्टअपसाठी नवे धोरण, फ्रेट कॉरिडॉरला हिरवा कंदील

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, हे प्रत्येकालाच वाटत असते. अशी मागणी करणे काही गैर नाही. राज ठाकरे – उद्धव ठाकरे युतीबाबत विचारले असता अगोदर युती तर होऊ द्या, नंतर पाहू. सर्वप्रथम ते वेगळे का झाले होते, याचा अभ्यास करायला हवा, असे राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले.