Bacchu Kadu : मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही विदर्भावर अन्याय

Injustice to Vidarbha Despite Having a Chief Minister from the Region : बच्चू कडूंची टीका, ‘हिंदुत्ववादी सरकार दहा वर्षांपासून सत्तेत, मग हिंदू धोक्यात कसे?’

Amravati “आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहोत. पण शेतमाल हमीभावापेक्षा कमी किंमतीत विकावा लागतो. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. विदर्भाचेच मुख्यमंत्री असताना विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे,” अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली.

शेतकऱ्यांच्या वेदनांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आज अनेक आमदार पक्षाच्या गुलामीत अडकले आहेत. “पक्षनिष्ठा काही नसते. माझ्यावरसुद्धा निष्ठा ठेवू नका; आपल्या आई-वडिलांवर आणि मायभूमीवर निष्ठा ठेवा,” असे आवाहनही त्यांनी केले.

Bhushan Gawai : भुतानचे संविधान म्हणजे स्वातंत्र्य आणि सामूहिक प्रगतीचा सुंदर संगम !

ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आजचे नेते कुणाचेच नाहीत, ते फक्त स्वतःसाठीच जगतात. त्यांना सामान्य जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्यासाठी पक्षच सर्वस्व आहे.”

बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रण आणायचे असेल, तर मुळापासून धोरणे बदलली पाहिजेत. आज शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांत सोयाबीन विकावे लागत आहे, आणि सरकारने अजून एकही खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. शेतकऱ्यांचा गुन्हा नेमका काय?”

“कापसाला केवळ सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावाच्या वीस टक्के बोनसचे आश्वासन दिले होते; मात्र तो बोनस मिळालाच नाही. उलट शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात माल विकावा लागत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

Help for farmers : शेतकऱ्यांना मदत नाही दिली, तर निवडणुका होऊ देणार नाही

त्यांनी पुढे सांगितले, “शेतकरी अधिकाधिक कर्जबाजारी होत आहे, तरीही योग्य वेळी कर्जमाफी मिळत नाही. हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे दुर्दैव आहे.”