Bachchu Kadu Targeted DCM Ajit Pawar : अमरावती येथे दिव्यांगांच्या मागण्यांसाठी मोर्चा
Amravati Bachchu Kadu चार महिन्यांपासून अंध, अपंगाचे पैसे मिळाले नाहीत. निधी उपलब्ध न झाल्यास वित्त विभागाचा पगार करणार नाही, असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे ‘दादा क्या हुआ, तेरा वादा?’ याची आठवण कडू यांनी अमरावती येथे काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना करून दिली.
गाई, म्हशी, मेंढरं, बकऱ्या घेतल्या, पण पुढे काय करायचे? चारायला जागा नाही. शासन-प्रशासन जर वाघाच्या नावानं चांगभलं करत असेल, तर शेतकरी आणि मेंढपाळ यांची ताकद शासनाला दाखवू. असा गर्भित इशारा माजी मंत्री व प्रहारचे संस्थापक बच्चू यांनी मंगळवारी दिला. शेतकरी आणि मेंढपाळाचे ‘वाडा आंदोलन’ मंगळवारी विभागीय आयुक्तालयावर करण्यात आले. यावेळी मोर्चाला संबोधित करताना बच्चू कडू बोलत होते. बच्चू कडू यांच्या सोबतीला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेवराव जानकर होते.
Shock for Congress in Balapur : बाळापूरमध्ये काँग्रेसला धक्का !
पारंपरिक वेशात मेंढपाळ बांधवांसह शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते. बच्चू कडू व जानकर यांनीदेखील अंगावर घोंगडी व हातात काठी घेऊन घोड्यावर स्वार होत मोर्चाचे नेतृत्व केले. मेंढ्या चारता-चारता पिढ्या बरबाद होत आहेत, यापुढे ही मस्ती चालणार नाही, उद्या कायदा हातात घेऊ, चारा आहे पण चारू देणार नाही, याच्या विरोधात लढाई आहे, असे कडू यांनी सांगितले. मोर्चासाठी चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार : महादेव जानकर
काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार असल्याचा आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला. पुन्हा ठिकठिकाणी मोर्चा काढू, मेंढपाळ व शेतकरी एकत्र येऊन सत्ता हलवून टाकू. प्रहार व राष्ट्रीय पक्षाचे आमदार वाढवा, राज्यातील सत्ता बदलू, असा आशावाद जानकर यांनी व्यक्त केला.