The announcement of freedom from school bags was only on paper, but neck and back pain became more common : दप्तरमुक्तीची घोषणा कागदावरच, मान, पाठदुखीच्या व्याधी बळावल्या
Wardha Students : पहिल्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याचे वजन साधारणत: सोळा किलो असेल, तर त्याच्या पाठीवरील दप्तराचे वजन दहा ते बारा किलोच्या आसपास असते. त्यामुळे त्यांना पाठ व मानदुखीसारखे आजार बळावतत आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांत विद्यार्थ्यांना विविध विषय शिकविले जातात. प्रत्येक विषयाचे पुस्तक, वही, सराव पुस्तके सोबत न्यावी लागतात. त्यामुळे दप्तराचे ओझे वाढते.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने अनेकदा घोषणा केल्या. शालेय पातळीवर सूचनाही दिल्या. सरकारने पुस्तकांमध्येच वह्यांची पाने जोडून देण्यासह अनेक उपाययोजना राबवल्या. शाळांनीही आपल्या पातळीवर ओझे कमी करण्यासाठी अनेक प्रयोग राबवले. मात्र, त्यात सातत्य नसल्याने उपाययोजना कागदावरच राहिल्या. वह्या, पुस्तकांची संख्या वाढतच गेली. विद्यार्थ्यांना आता त्याचा त्रास सुरु झाला आहे. मात्र, सर्वच पातळ्यांवर याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
The birth rate of girls increased : जिल्ह्याला लक्ष्मी पावली, मुलींचा जन्मदर वाढला !
प्रमाणापेक्षा अतिरिक्त वजनाचे दप्तर शाळेत घेऊन जाणार्या विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास, सांधे आखडणे, मणक्याची झीज होणे, मान दुखणे, स्नायू आखडणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यांसारखे आजार होऊ शकतात. बालवयात विद्यार्थ्यांच्या शरीरावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांमुळे भविष्यातही त्यांना अनेक शारीरिक, मानसिक व्याधी जडू शकतात, असे शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.
राज्यातील सर्व शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरुपात चार भागांमध्ये विभागून प्रत्येक पाठ, कवितेनंतर गरजेनुसार कोरी पाने समाविष्ट करावी, अशी अंमलबजावणी करण्याची सूचना दिली. पाठ्यपुस्तकात देण्यात आलेल्या पानांचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल, अशा सूचना दिल्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. मात्र, त्यात सातत्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर ओझे वाढून त्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत.
Soybean crop : सोयाबीन विकले तीन हजार आठशेत; तुरीचे दर सात हजारांच्या खाली !
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांचा अभ्यासक्रम निश्चित केला जातो. त्याचप्रमाणे त्यांच्या वयाचा विचार करून दप्तराचे वजन निश्चित असावे. हल्ली विद्यार्थ्यांचे वजन आणि त्याच्या पाठीवरील दप्तरांचे वजन जवळपास सारखेच असते. त्यामुळे दप्तराच्या वजनाने विद्यार्थ्यांना पाठीचा आणि मानेचा त्रास होतो. इतकेच नाही तर त्यांची वाढही खुंटण्याची शक्यता निर्माण होते, असे डॉक्टर सांगतात.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने अनेक घोषणा केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने वजनदार दप्तर पाठीवर घेऊन जावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांना पाठदुखी व मानदुखीचा त्रास सुरू होतो. याचा शिक्षण विभागाने विचार करून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असे मत पालकांनी व्यक्त केले.