Be aware of duplicate leaders : विदर्भस्तरीय जनकल्याणकारी संमेलनात विरोधकांवर हल्लाबोल
Nagpur एकेकाळी विदर्भात चांगला प्रभाव असलेल्या बहुजन समाज पक्षाला गटातटाच्या राजकारणाचा मोठा फटका बसला. आता पक्षाचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता बसपाकडून स्वपक्षीयांवर टीका करणे टाळावे. असे ठरविण्यात आले आहे. बसपाच्या विदर्भस्तरीय जनकल्याणकारी संमेलनात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत भाजपला टार्गेट करण्यात आले.
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीमुळे निळ्या झेंड्याचा व बाबासाहेबांचा सन्मान वाढल्याने विरोधकांनीही त्याचा वापर सुरू केला. परंतु अशा डुप्लिकेट नेत्यांपासून सावध राहावे, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय समन्वयक माजी राज्यसभा खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी येथे केले. चॉक्स कॉलनी येथील ललित कला भवन सभागृहात आयोजित बसपा विदर्भस्तरीय जनकल्याणकारी संमेलनात ते बोलत होते. भाजपकडून संविधान गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे.
Republic Day Parade : चिल्हाटीच्या सरपंचांना दिल्लीचं निमंत्रण!
या माध्यमातून आंबेडकरी विचारधारेच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर या संमेलनात भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले.
या संमेलनात अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे होते. तर मोहन रायकवार, पृथ्वी शेंडे, नागोराव जयकर, उत्तम शेवडे, रंजना ढोरे, राजकुमार बोरकर, चंद्रशेखर कांबळे, अभिलेष वाहने, योगीराज लांजेवार, जितेंद्र घोडेस्वार, सुनंदा नितनवरे, मोहम्मद इब्राहिम प्रामुख्याने उपस्थित होते.
MLA Manoj Kayande : ३० वर्षांत सिंदखेडराजात कामेच झाली नाहीत!
अलीकडे राजकारणात बाबासाहेबांचा त्यांच्या नावाने निळ्या झेंड्याचा काँग्रेस व भाजपवाले मोठ्या प्रमाणात वापर करायला लागले आहेत. निळी टोपी, निळी साडी, निळे जॅकेट, निळा फेटा, निळा झेंडा व हाती संविधानसुद्धा घेत आहेत. त्यांनी बाबासाहेबांच्या हत्तीला संपविण्याची शपथ घेतली. त्यासाठी आजपर्यंत ते कार्यरत आहेत अशा ढोंगी बगळ्यांपासून सावध राहावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.