Bhandara, Gondia, Chandrapur, Gadchiroli supply milk to Nagpur : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीतून येते नागपुरात
नागपूर जिल्ह्याची दुधाची गरज भागविण्यासाठी नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून दुधाचे संकलन केले जाते. ६ लाख १८ हजार ६९२ लिटर दूध जिल्ह्याला प्राप्त होत आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या ५७ लाखांच्यावर असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीच आहे. म्हणून दूध भेसळीचे प्रकार होत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.
इतर जिल्ह्यांतून ४ लाख ५४ हजार ९५४ लिटर दूध नागपुरात येते. एकूण संकलित होणाऱ्या दुधापैकी ३ लाख ७० हजार ८१ लिटर दूध प्रतिदिन वितरित केले जाते. उर्वरित २ लाख ४८ हजार ६११ लिटर दूध दुग्धजन्य पदार्थांसाठी वापरले जाते. जिल्ह्यात एकूण ४ प्रकल्पांच्या माध्यमातून दूध संकलित करून वितरित केले जाते.
Maharashtra Education Department : शिक्षण उपसंचालक विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसले
गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरील प्रदेशातून काठियावाडी बेडे देशभरात विखुरलेले आहेत. नागपूर जिल्ह्यातही चहूबाजूंनी ८३ हून अधिक बेडे आहेत. या प्रत्येक बेड्यात दहा ते बारा कुटुंबे असतात. आणि प्रत्येक बेड्यात १५० ते एक हजारावर गीर प्रजातीच्या देशी गाई आहेत. हे सगळे बेडे मिळून महिन्याकाठी लाखो लिटर दूध घेत असतात.
मोठ्या प्रमाणात ब्रँण्डला पुरवठा केला जातो. नागपुरात गीर गाईच्या दुधाची मागणी वाढली आहे. महिन्याकाठी दीड लाख लीटर दुधाची होणारी खुली विक्री पाहता नागपुरात पारंपरिक दुग्धक्रांतीला प्रोत्साहन मिळत आहे. गीर, सहिवाल, गवळाऊ यासह हरियाना, राठी, लालसिंधी आदी प्रजातींच्या गायींपासून जिल्ह्याला दूधपुरवठा होतो. संकरित प्रजातींमध्ये जर्सी व होलस्टन या संकरित प्रजातींपासूनही दूध प्राप्त होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत पाच टक्के सहभाग असणारे हे एकमेव क्षेत्र आहे, असे दुग्धविकास क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्र्यांच्या मामाच्या गावाला जाऊया!
कुणीचे किती दूध?
नागपूर जिल्हा संघाकडून ३ हजार ३०२ लिटर, हल्दीराम डेअरीकडून ६६ हजार ५०६, दिनशॉ डेअरीकडून ३३ हजार ३१६, मदर डेअरीकडून ५१ हजार २२७ आणि क्रीम लाइन डेअरीकडून ९ हजार ३८७ लिटर दूध संकलित केले जाते, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.