Bhaskar Jadhav lashed out at the government : मंत्री स्वतःच स्वतःचं अवमुल्यन करून घेत आहेत
Mumbai : विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही चर्चा करत असताना मंत्रीच उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे या सभागृहाला काही अर्थ आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. बरं.. मंत्री नाहीत तर नाहीत, पण संबंधित विभागाचे सचिवसुद्धा राहात नाहीत. त्यामुळे या सभागृहातील चर्चा वांझोटी आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
यासंदर्भात आज (१९ मार्च) सभागृहात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, सर्वच सभासदांची भावना मी मांडतो. पूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा होत असे, तेव्हा लॉबीमध्ये पोलिस महासंचालक, पोलिस कमिशनर आणि संबंधित सर्व अधिकारी बसायचे. आज अधिकारी तर सोडा, पण संबंधित विभागाचे सचिवही येथे बसत नाहीत. केवळ आणि केवळ मंत्र्यांचे पीए येथे बसतात. चर्चा सुरू असताना सचिवांनी येथे बसले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी लाऊन धरली.
Fraud Birth-death records : ११ हजार जन्म-मृत्यूच्या नोंदणीचा लागणार Result!
राज्यात कुठेही घटना घडली की मुख्यमंत्री तेथे पोहोचतात. पण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचत नाहीत. परवा नागपुरला दंगळ उसळली पण पोलिस महासंचालक गेले नाहीत. अधिकाऱ्यांनी लॉबीमध्ये यावं, यासाठी अध्यक्षांनी सुचना द्यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. सचिव मंत्र्यांच्या कॅबीनमध्ये बसून नोंद घेतात आणि हे चक्क मंत्रीच सांगतात. ही कुठली पद्धत आणली, असा संतप्त सवालही त्यांनी केला. असे करून मंत्री स्वतःच स्वतःचं अवमुल्यन करून घेत आहेत, असेही ते म्हणाले.
वरच्या सभागृहातही कामकाज सुरू आहे. सामुदायीक जबाबदारी म्हणून संबंधित मंत्री नसताना इतर मंत्री नोंद घेतात. मी नोंद घेत आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान सदस्यांच्या सुचनांची नोंद सचिवांनी घ्यावी, यासाठी सांगावे, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाला केली. त्यावर अध्यक्षांनी सकारात्मक उत्तर दिले. यानंतर गुलाबराव पाटील आणि विखे पाटलांनी मांडलेला मुद्दा जयंत पाटील यांनी खोडून काढला.
Suicide due to debt : चार दशके लोटली; शेतकरी आत्महत्यांचे सावट कायम!
ज्या विषयाची चर्चा विधानसभेत सुरू आहे, तीच चर्चा वरच्या सभागृहात म्हणजे विधानपरिषदेत सुरू राहात नाही. त्यामुळे वर कोणतेही मंत्री नाहीत. मी आत्ताच जाऊन आलो. मंत्री जी माहिती देत आहेत, ती चुकीची आहे. मंत्र्यांनी सभागृहाचा अपमान वारंवार का करावा, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.