Report to be submitted to Government soon : लवकरच सादर होणार अहवाल; कोण येणार अडचणीत?
Nagpur भीमा कोरेगावदिनी झालेला हल्ला हा सुनियोजित कट होता. मूलतत्त्ववादी संघटनेने तो घडवून आणला होता. त्यांचे पितळ उघडे पडले. पोलिस यंत्रणांचे अपयशही यातून पुढे आले. याप्रकरणीचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे. यात शरद पवार, प्रा. जोगेंद्र कवाडे, ॲड. प्रकाश आंबेडकरांसह जवळपास ८५ जणांची उलट तपासणी करण्यात आली. याप्रकरणी गठित आयोगाचा अहवालही तयार असून तो लवकरच सरकारला सादर होईल.
इतिहासाला विकृत स्वरूप देण्याचा मूलतत्त्ववादी संघटनेचा प्रयत्न फसला असून, सरकारनेच भीमा कोरेगावचा इतिहास सत्य असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे न्याय मिळेल अशी अपेक्षा या प्रकरणात न्यायालयात लढा देणारे ॲड. किरण चन्ने यांनी व्यक्त केली. या प्रकरणात कोण अडकणार व कुणाची सुटका होणार हे लवकरच स्पष्ट होईल.
CM Devendra Fadnavis : वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वीज नियोजन!
भीमा कोरेगावचा इतिहास खोटा असल्याचा जोरदार प्रयत्न झाला. ऐतिहासिक दस्तऐवज आणि मिलिटरी पुस्तक, सिंबॉल आदी पुरावे सादर करण्यात आले. राज्य सरकारनेसुद्धा भीमा कोरेगावचा इतिहास हा सत्य असल्याचे विधिमंडळात मान्य केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भीमा कोरेगाव येथील हल्ल्याशी एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नसल्याचेही ॲड. चन्ने यांनी स्पष्ट केले.
Harshvardhan Sapkal : हा तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार
वारकरी हे अंधश्रद्धेला विरोध करतात. समतावादी आहेत. वारकरी हे अहिंसेवर विश्वास करतात. धारकरी हे हिंसावादी आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या वारीत पुण्यात तलवारी काढल्या गेल्या. वारकरी हे विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवतात. त्यामुळे त्यांच्यात धारकरी घुसून असे प्रकार करतात, याकडे ॲड. चन्ने यांनी लक्ष वेधले.