Bhutan’s Constitution: A Beautiful Fusion of Freedom and Collective Progress: न्यायसंस्थांमधील सहकार्य, न्यायिक देवाणघेवाण आणि भावी भागीदारीवर चर्चा
Bhutan : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई हे भुतानच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दोऱ्यात त्यांनी भुतानचे संविधान, न्यायव्यवस्था आणि दोन्ही देशांतील सहकार्य या विषयांवर महत्वपूर्ण विचार मांडले. भुतानच्या थिंफू येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेंजमेंटमध्ये जिग्मे सिंगे वांगचुक (JSW) लॉ स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला भुतानच्या राजकुमारी आणि JSW लॉ स्कुलच्या अध्यक्ष सोनम डेजेन वागचुक, भुतानचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती लायोनपो नॉर्बू त्शेरींग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संसद सदस्य तसेच शिक्षण आणि विद्यार्थी उपस्थित होते. संविधानिक प्रशासन बळकटीसाठी न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर न्यायमूर्ती गवई यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, भुतानचे संविधान न्याय आणि आनंद, हक्क आणि जबाबदाऱ्या, तसेच स्वातंत्र्य आणि सामूहिक प्रगती यांचा सुंदर संगम घडवते.
Help for farmers : शेतकऱ्यांना मदत नाही दिली, तर निवडणुका होऊ देणार नाही
भुतानचे संविधान न्यायाच्या संकल्पनेला दंडात्मक मर्यादांपलिकडे नेऊन करुणा, कल्याण आणि सामाजिक ऐक्य व पर्यावरणीय संतुलन करते. दौऱ्यादरम्यान न्यायमूर्ती गवई यांनी भुतानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व न्यायाधीशांची भेट घेतली. यावेळी भारत-भुतान न्यायसंस्थांमधील सहकार्य, न्यायीक देवाणघेवाण आणि भावी भागीदारीवर चर्चा झाली. त्यांनी भारत आणि भुतान यांच्यातील सखोल मैत्रीचे पुनरुच्चारण करत भुतानच्या न्यायव्यवस्थेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला भेट देण्याचे आमंत्रण दिले.
Use of AI : एआयच्या वापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
भुतान सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक न्यायव्यवस्थेचा संदेश न्यायमूर्ती गवई यांनी दिला. भुतानच्या न्यायसंस्थेला तंत्रज्ञानवृद्धी आणि प्रणाली एकीकरणाच्या माध्यमातून भारताच्या सातत्यपूर्ण पाठींब्याची हमीही त्यांनी दिली. या दौऱ्यात त्यांना भारताच्या भुतानमधील दुतावासालाही भेट दिली. त्यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे नोंदणी अधिकारी, संशोधन व नियोजन केंद्राचे संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी होते.








