Upadhyays criticism, calling it a humorous gathering : “टोमणा मेळावा” संबोधत उपाध्येंची टीका
Mumbai: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क मैदानात पार पडला. मात्र या मेळाव्यातील भाषणावरून भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंच्या सभेला थेट “टोमणा मेळावा” अशी उपाधी दिली आणि तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.
उपाध्ये म्हणाले, “विचारांचं सोनं लुटायला बोलवायचं आणि हातावर कथलाचा कटोरा ठेवून टोमण्यांच्या तालावर नसत्या कर्तबगारीचे गोडवे गाणं एवढा अट्टहास कशासाठी? जिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या विक्रमी गर्दीच्या सभा व्हायच्या, तिथे आता रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत. पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पाण्यासारखा पैसा ओतून जुन्या रडगाण्यांचा मेळावा घेणं म्हणजे केवळ दुराग्रह आणि अहंकार.”
भाजप प्रवक्त्यांनी पुढे उपरोधिक सल्ला दिला की, “एवढ्याशा कारणासाठी कोट्यवधींचा चुराडा करण्याऐवजी तेच रडगाणं सामनातून वाजवलं असतं, तर रिकामे रकाने तरी भरले गेले असते. पण या अहंकारातूनच मुंबई हातातून गेली. २०१४ नंतर मुंबईकरांनी विकासाला मतदान केलं, हे वास्तव मान्य करण्याची तयारी नाही. तीच जुनी पालुपदं, तीच अहंकारी भाषा आता मुंबईकरांना भावत नाही आणि नवमतदारांना तर अजिबात आकर्षित करत नाही.”
उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेची तुलना रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या निरोशी केली. “महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहेत, पण या समस्यांकडे लक्ष न देता उद्धव ठाकरे मेळाव्याचा हट्ट धरतात. ओढूनताणून झालेल्या सभेत ना गर्दी होती, ना द्यायला विचार. केवळ रिकाम्या खुर्च्या आणि निराशा एवढंच दिसलं,” असा टोला त्यांनी लगावला.
Kadam Vs Raut : ‘बाळासाहेबांची डेडबॉडी दोन दिवस… ‘ ही तर बेइमानी !
भाजपकडून झालेल्या या जोरदार प्रतिआक्रमणामुळे दसरा मेळाव्यानंतर राज्यात नव्या राजकीय वादळाची चाहूल असल्याचं बोललं जात आहे.