Private driver along with engineer in ACBs trap : अभियंत्यासह खासगी चालक ‘एसीबी’च्या जाळ्यात
Yavatmal : लाचखोरीच्या अनेक विविध घटना समोर येताना पाहायला मिळतात. मात्र स्मशानभूमीचे कामातही लाच घेण्याचे प्रकार यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या घटनेत अभियंत्यासह त्याचा खाजगी चालक लाच घेताना जाळ्यात सापडला. 10 लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या आर्णी येथील उपअभियंत्यासह कंत्राटी वाहन चालकाला रंगेहाथ अटक करण्यात आली.
बांधकाम विभागाच्या आर्णी कार्यालयात बुधवारी, सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संतोष भगवानराव क्षिरसागर (53) असे लाच स्वीकारतांना अटक करण्यात आलेल्या उपअभियंत्याचे तर सागर शंकरराव भारती (27) असे अटक करण्यात आलेल्या त्याच्या अधिनस्थ कंत्राटी वाहन चालकाचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील एका गावात स्मशानभूमिचे सुशोभिकरण करण्यात आले होते. त्याचे 10 लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच त्याच्याकडे येरझारा घालत होते. तेंव्हा लाचखोर अभियंता क्षिरसागर याने 14 जुलैला त्यांना देयक काढण्यासाठी 2 टक्क्यांप्रमाणे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली.
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस टपल्या, टिचक्या , टोमणे मारण्यात पटाईत !
सरपंचांनी होकार देत वेळ मारून नेली. तसेच यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून पोलीस निरीक्षक मनोज ओरके यांच्याकडे रितसर तक्रार दिली. त्यानंतर पीआय ओरके यांनी दोन शासकीय पंच आणि व्हॉईस रेकॉर्डर सरपंचाच्या सोबत देत लाचेच्या मागणीची खात्री केली. शिवाय त्यांच्या मधे सायंकाळी लाचेच्या 20 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये देण्याचेही ठरले. त्यावरून लाचलुचपत विभागाने सायंकाळी बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी कंत्राटी चालक भारती याच्या करवी सरपंचाकडून उपअभियंता क्षिरसागर याने लाच स्विकारताच पंचाने ईशारा दिला.
Land Fragmentation : जमिनींचे तुकडे पाडण्यासंबंधीच्या जटिल प्रश्नावर तोडगा निघणार !
दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही लाचेच्या रकमेसह अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन धनवट, जमादार अतुल मते, अब्दुल वसीम, सचीन भोयर, राकेश सावसाकडे, भागवत पाटील, चालक अतूल नागमोते आदींचा समावेश असलेल्या पथकाने केली.