Cancer treatment : प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा !

Instructions from Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने प्रभावी धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कर्करोगावर परिणामकारक नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर उपचार केंद्रांची उभारणी आवश्यक असून, प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा, निदान, डे केअर, रेडिओथेरपी व केमोथेरपी युनिट उभारण्याचे आदेश त्यांनी दिले.

नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाचे अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून, यासाठी आवश्यक निधी पुरवणी मागणीत उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय साईनगर, शिर्डी येथे श्री साई संस्थानच्या वतीने अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.

Vanchit Bahujan Aghadi : परराष्ट्र आर्थिक धोरणामुळे देशाचे नुकसान, अंबानींचा लाभ!

राज्यातील गरजू रुग्णांना तत्काळ सेवा मिळाव्यात यासाठी तीन प्रकारच्या उपचार केंद्रांपैकी एल-3 केंद्रासाठी सिंगल क्लाउड कमांड सेंटर स्थापन करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना शीघ्र निदान आणि परिणामकारक उपचार मिळावेत, यावरही त्यांनी भर दिला.

कर्करोग प्रतिबंध आणि वेळेवर उपचार यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यापक धोरण आखले आहे. हे धोरण असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे. महिलांसाठी स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग तपासणी मोहिमा राज्यभर राबवल्या जात आहेत. 30 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला स्क्रीनिंगमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात दोन समर्पित कर्करोग रुग्णालये आणि आठ जिल्हा रुग्णालये उभारण्याची योजना असून, ग्रामीण व शहरी भागात रुग्णांना सुलभ उपचार उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. मेडिकल ऑफिसर्सना डोके व मानेच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यामुळे प्राथमिक स्तरावरच निदान शक्य होणार आहे.

राज्य आजार सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. यामुळे कर्करोगाचे लवकर निदान होईल, ग्रामीण व शहरी भागात उपचार सहज उपलब्ध होतील, उपचारांचा आर्थिक भार कमी होईल आणि जागरूकतेमुळे रोगाचा प्रसार आटोक्यात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Sudhir Mungantiwar ; ‘केशवा… माधवा…’ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वरांनी भारावले भजनी

तथापि ग्रामीण भागात अजूनही पुरेशा स्क्रीनिंग सुविधा नाहीत, जनजागृती कमी आहे आणि खर्चिक उपचारामुळे गरीब रुग्णांना अडचणी येत असल्याची आव्हाने कायम आहेत.