Cooperative group in Anjangaon Surji in BJP : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन; महाविकासआघाडीला जोर का झटका
Amravati लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत महाविकास आघाडीसोबत तन-मन-धनाने असलेल्या तालुक्यातील सहकार गटाने विजय मिळवला. मात्र, दोन्ही निवडणुकांनंतर सहकार संस्थांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच तालुक्यातील सर्वात मोठ्या सहकार गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील सोसायट्या, खरेदी-विक्री संघ, जिनिंग-प्रेसिंग, कृषी उत्पन्न बाजार समितीवर मजबूत पकड असलेल्या अॅड. जयंत साबळे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपाच्या नेतृत्वाला स्वीकारत पक्षप्रवेश केला. त्यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली आहे.
Chandrashekhar Bawankule : सिंचन आणि पुनर्वसनाची कामे Pending ठेवू नका!
शनिवारी (२२ फेब्रुवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार प्रवीण पोटे, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण तायडे, किरणताई महल्ले, बाळासाहेब वानखडे, नितीन गुडदे, गोपाल चंदन, अॅड. पद्माकर सांगोळे, मनीष कोरपे, विवेक गुल्हाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आणि जिनिंग-प्रेसिंग या तीन महत्त्वाच्या संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह बहुसंख्य संचालकांनी भाजपात प्रवेश केला. या निर्णयामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विरोधी गटात मात्र शांतता पसरली आहे.
Chandrashekhar Bawankule : प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू!
पक्षप्रवेश करणाऱ्यांची नावे:
कृषी उत्पन्न बाजार समिती – सभापती अॅड. जयंत गुणवंतराव साबळे, संचालक शंकरराव चोरे, विजयराव कळमकर, अनंत रोकडे, विशाल पंडीत, सागर घोगरे, संजय काळमेघ, चंद्रशेखर शेळके, शे. जमील शे. रहमान, संचालिका पूनमताई पोटे, शारदाताई ढोक.
जिनिंग-प्रेसिंग – अध्यक्ष सुबोध काळमेघ, गुरुदास वानखडे, माजी अध्यक्ष अशोक चरपे, गणेश सावरकर, प्रशांत भगत.खरेदी-विक्री संघ – अध्यक्ष गजानन धोटे, सुनील राऊत, रवी पोटे, माजी संचालक अमोल पोटे, संजय ढोक आदींनी भाजपात प्रवेश केला. सहकार गटाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे