Chandrashekhar Bawankule : आमच्यासारखी भूमिका गेल्या ५० वर्षांत कुणी घेतली नाही !

Eknath Shinde and Devendra Fadnavis Take Firm Stand on Maratha Issue : मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी योग्य भूमिका घेतली

Nagpur : मराठा समाजाच्या बाबतीत सरकार म्हणून आमची भूमिका सहकार्य करण्याचीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीच दूर केले नाही. नियमात बसते, ती भूमिका ते घेतात. मराठा समाजाच्या बाबतीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आजवर जी भूमिका घेतली, तशी गेल्या ५० वर्षांत कुणी घेतली नाही, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यानंतर ओबीसी समाजही आक्रमक झाला. दरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, यापूर्वीची ओबीसींची प्रमाणपत्र पिढीजात आहे. जेवढे लोकांचे प्रमाणपत्र आढळेल, जे त्यांना पूर्वीच दिले आहेत. अजून सर्वेक्षण सुरू आहे. प्रमाणपत्र यापुढेही मिळतील. पण सरसकट प्रमाणपत्र देऊ शकत नाही, आता सरसकट प्रमाणपत्र मागितले तर जमणार नाही. नोंद असल्यास त्यांना आरक्षण मिळेल. आंदोलक म्हणायचे, सर्वेक्षण करा आम्ही मागणी मान्य केली आणि सर्वेक्षण केले. प्रमाणपत्र देण्याचं काम सातत्याने सुरू आहे…

Babanrao Taywade : ४३ वर्षांनंतर मिळालेल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही !

मराठा समाजाच्या आंदोलनावर ज्येष्ठ नेते काहीही बोलत नाहीयेत. त्यांचे न बोलण्याचे कारण काय? आज ही चुप्पी का? राज्याला त्यांची भूमिका कळली पाहिजे. काँग्रेस प्रमाणे त्यांची भूमिका अस्पष्ट तर नाही, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. मराठा असो की अन्य कुठलाही समाज आरक्षणाचा जर प्रश्न येत असेल, तर ही जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे यापूर्वी सत्ता उपभोगलेल्यांनीही भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.