Farm roads in Maharashtra will be of Nagpur, Latur and Amravati pattern : नकाशे तयार करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू
Nagpur : शेत रस्ते, पांदण रस्ते आणि शिव रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि त्यांमुळे होणारी भांडणे यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील रस्त्यांचे व्यवस्थापन ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. असे असले तरी शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र निधी आणि लेखाशीर्ष नाही. हा मुद्दा आज (११ जुलै) लक्षवेधी सुचनेद्वारे उपस्थित करण्यात आला. त्यावर नागपूर, लातूर, अमरावती पॅटर्न अंतर्गत रस्ते बनवण्यासाठी १३ सदस्यांची समिती स्थापन केली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अभिमन्यू पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधीला सुमीत वानखेडे आणि इतर आमदारांनीही पाठिंबा दिला. यावर शेत रस्त्यांना दर्जा देणे, त्यांची मालकी व देखभाल महसूल विभागाकडे सोपवणे आणि स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करून निधीची तरतूनद करणे, यांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. ते म्हणाले की, गाव आणि शेत रस्त्यांचे नकाशे तयार करून अतिक्रमण हटवण्याची मोहिम राबवली जात आहे. पुणे जिल्ह्यात लोक अदालतींद्वारे ११ हजार प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे.
Chandrashekhar Bawankule : ७२ सदनिका आणि आठ गाळे पाडून डॉ. आंबेडकर कुटुंबियांना परत दिली जमीन !
शेत रस्त्यांसाठी किमान १२ फूट रुंदी निश्चित केली जाईल आणि खासगी मालकीच्या रस्त्यांसाठी संमतीपत्राद्वारे नोंदी केल्या जातील. रोजगार हमी, ग्रामविकास आणि महसूल विभागांशी चर्चा करून स्वतंत्र लेखाशीर्ष आणि निधीची तरतूद करण्यावर विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनेनुसार शेत रस्ते खुले करणे, त्यांचे सर्वेक्षण आणि नंबरींग करणे, यांसाठी १३ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहीती बावनकुळे यांनी दिली.
Gopichand Padalkar controversy : धर्माचे राजकारण थांबवा, संविधानाचा सन्मान करा
शेत रस्त्यांचा प्रश्न १५० हून अधिक आमदारांचा आणि शेतकऱ्यांचा मुलभूत हक्क असल्याचे सुमीत वानखडे यांनी सांगितले. शेतांतील उत्पादन बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्के रस्ते आवश्यक आहेत. मातोश्री पांदण रस्ता योजनेसाठी स्वतंत्र निधी आणि कालबद्ध कार्यक्रमाची गरज असल्याची मागणी त्यांना लाऊन धरली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही शेत रस्त्यांमुळे होणाऱ्या भांडणांचा आणि हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या मागण्यांवर सर्वसमावेश उपाययोजना करण्याचे आश्वसान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.