Take action against officials guilty of forest land scam :महसूलमंत्र्यांचे निर्देश; घोटाळ्यातील दोषींना शोधण्याचे फर्मान
Nagpur नागपूरमधील वनजमीन घोटाळ्यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत बावनकुळेंनी हे निर्देश दिले.
वन विभागाच्या अधिकाऱ्याने संगनमताने कोट्यवधी रुपये किमतीच्या ४२ एकर वनजमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर याबाबत महसूलमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. या घोटाळ्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक व्यक्तींना हाताशी धरून वनजमिनीचे पट्टे वाटप करत ही जमीन हडपण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
Operation Sindoor : देशाला न्याय मिळाला, सैन्याच्या पाठिशी उभे राहा!
प्राथमिक माहितीनुसार या जमिनीचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपये आहे. नियमांचा गैरवापर करत बनावट कागदपत्रांद्वारे हे वाटप करण्यात आले. या प्रकरणाने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाला भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार ठरवत, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले.
त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आणि वन विभागाला तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी स्थानिक व्यक्तींशी हातमिळवणी करत ४२ एकर वनजमिनींचे पट्टे तयार केले. यात नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय आहे.
Ajit Pawar अजितदादांच्या नावाने यात्रा काढणार, पण यात्रेकरू कुठून येणार?
स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारींमुळे हा प्रकार उघडकीस आला. ज्याची चौकशी आता स्वतंत्रपणे होणार आहे. जिल्हाधिकारी आणि वन विभाग चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. तसेच, या प्रकरणात सामील असलेल्या स्थानिक व्यक्तींचीही चौकशी होणार असून, महसूल मंत्र्यांनी या घोटाळ्याच्या तळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.