Chandrashekhar Bawankule : ईव्हीएमवरून बावनकुळेंचा काँग्रेसला आणखी एक सल्ला !

Bawankule’s another advice to Congress on EVMs : नेतेगिरी टिकवण्यासाठी देशातील जनतेची नस ओळखावी लागते

Nagpur : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विरोधात रान उठवले. काँग्रेसने नानाविध आरोप निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर केले. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केल्यानंतर काँग्रेसचा विरोध अधिक तीव्र झाला. या परिस्थितीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला आणखी एक सल्ला दिला आहे.

यासंदर्भात नागपुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, ईव्हीएम कुणाच्या काळात आलं, हे काँग्रेस नेत्यांनी एकदा तपासून घ्यावं. केंद्रात मनमोहन सिंह सरकारच्या काळापासून ईव्हीएम प्रणाली सुरू झाली. त्याला आता दोष देऊन काहीही अर्थ नाही. पक्ष वाढवण्यासाठी किंवा नेतेगिरी टिकवण्यासाठी देशातील जनतेची नस ओळखावी लागते. दुर्दैवाने काँग्रेसला ते जमले नाही आणि आता ईव्हीएमला दोष देत फिरत आहेत. काँग्रेसला आणखी एक संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच काँग्रेसने आक्षेप घ्यावा नाहितर ही निवडणूक हरल्यावरही काँग्रेस तोच आरोप करणार.

Dnyanesh Kumar : “तुमच्या आया-बहिणींचं सीसीटीव्ही फुटेज देणं योग्य आहे का?” – निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यावर संताप

नागपुरातील विकास कामांच्या बाबतीत बोलताना बावनकुळे म्हणाले, यावेळी १२०० कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. त्याचं नियोजन घेण्यासाठी बैठक घेतली. विकसीत देश, विकसीत महाराष्ट्र त्याचप्रमाणे विकसीत नागपूर कसे होणार, याचे नियोजन आम्ही करत आहोत. नुकतेच पाटणसावंगी येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन झाले. या रुग्णालयात ३६ प्रकारच्या सेवा देण्यात येत आहेत.

Prakash Ambedkar : अन्याय खरंच दूर करायचा आहे की केवळ दिखावा आहे?

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या संदर्भात प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री आणि मी स्वतः प्रत्येक नुकसानाचा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. पुढचे तीन दिवस राज्याच्या काही भागांत रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विभागांनी सतर्क रहावे आणि गरज असेल तेथे शाळांना सुटी द्यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. जी काही नुकसान भरपाई असेल, ती जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन खात्यातून देण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे पंचनामे जसजसे येतील त्यानुसार भरपाई देण्यात येईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.