Breaking

Charity department : ‘स्टॅम्प पेपर’ सक्तीला सरकारचा दणका

Government slams ‘stamp paper’ mandatory : धर्मादाय विभागातील आग्रह नियमबाह्य असल्याचा ठपका

Akola धर्मादाय विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून संस्था नोंदणीच्या शपथपत्रासाठी ‘स्टॅम्प पेपर’चा आग्रह नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी १०० रुपयांच्या ‘स्टॅम्प पेपर’ची आवश्यकता नाही. साध्या कागदावरील घोषणापत्रच ग्राह्य धरण्यात यावे, अशा सूचना धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. या संदर्भात धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी १३ जानेवारी रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय विभाग व कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. या आराखड्यानुसार नागरिकांचे दैनंदिन जीवनमान सुकर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालयांत शासकीय सोयी-सुविधांसाठी शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र आणि स्वयंसाक्षांकित कागदपत्रे स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.

धर्मादाय विभागातील काही क्षेत्रीय कार्यालयांत संस्था नोंदणी अर्जासोबत १०० रुपयांच्या ‘स्टॅम्प पेपर’वर शपथपत्र सादर करण्याचा आग्रह धरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, संस्था नोंदणी अर्जासोबत आवश्यक असलेले शपथपत्र साध्या कागदावर लिहिले तरी ग्राह्य धरावे, असे स्पष्ट निर्देश धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांनी दिले आहेत. विनाकारण १०० रुपयांच्या ‘स्टॅम्प पेपर’वर शपथपत्र करण्याचा आग्रह धरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Akash Fundkar : तालुका स्तरावर होणार अद्ययावत Sports Complex!

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम -३ अंतर्गत आयुक्तांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

कोणत्याही सरकारी कामासाठी शपथपत्र सादर करताना ‘स्टॅम्प पेपर’ बंधनकारक नाही. तरीही राज्यभरातील धर्मादाय विभागाच्या कार्यालयांमध्ये संस्था नोंदणीसाठी ‘स्टॅम्प पेपर’वर शपथपत्र देण्याचा आग्रह धरला जात होता. यामुळे नागरिकांना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेठीस धरत असल्याचे प्रकार वाढले होते.

PM Modi Nagpur Visit : दीक्षाभूमी भेटीतून पंतप्रधानांनी घडवले समतेचे दर्शन

साध्या कागदावर शपथपत्र ग्राह्य धरले जात असतानाही ‘स्टॅम्प पेपर’ची सक्ती का केली जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांनी संबंधित कार्यालयांना परिपत्रक जारी करून ‘स्टॅम्प पेपर’चा अनावश्यक आग्रह करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.