Breaking

Check bounced : मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेणाऱ्या आईला कारावास !

Imprisonment for mother taking loan for daughter’s marriage : चेक बाउन्स झाला; दंड भरला नाही तर शिक्षा वाढणार

Gondia आईने मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले. परतफेड करताना १ लाख ८७ हजार ५३० रुपयांचा चेक बाऊन्स झाला. प्रकरण न्यायालयात गेले आणि आईला सहा महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला. कारवाई कायदेशीरच झाली आहे. न्यायालयाचा निर्णयदेखील सर्वांनी मान्य केला आहे. पण देशाला हजारो कोटींचा चुना लावणारे आपली चुक सहज लपवू शकतात. आणि दुसरीकडे एका आई दोन लाखाच्या चेक बाऊन्ससाठी कारावास भोगते, हे दुर्दैव आहे.

मुलीच्या लग्नासाठी येथील आयपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीकडून कर्ज घेतले. त्या मोबदल्यात संस्थेला दिलेला चेक (धनादेश) बाउन्स झाला. या प्रकरणात न्यायालयाने संस्थेला दिलासा दिला. आरोपी महिलेला सहा महिन्यांचा कारावास सुनावला. चेकमध्ये नमूद रक्कम दोन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहे.

Ajit Pawar will ask Dhananjay Munde to resign : ..तर अजित पवार घेतील धनंजय मुंडेंचा राजीनामा !

आयपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीमधून महिलेने (५५) मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची मासिक हप्त्याने परतफेड करण्याचे कबूल केले होते. मात्र परतफेड करण्यात तिने कसूर केला. यावर आरोपीने संस्थेला एक लाख ८७ हजार ५३० रुपयांचा चेक ३ जुलै २०२३ रोजी दिला होता. मात्र तिच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक बाउन्स झाला.

MLA Randhir Sawarkar : निधी दिला, उपयोगात किती आला ?

यावर संस्थेने तिला नोटीस बजावले असता आरोपीने तो नोटीस परतावून लावला. अशात संस्थेच्या वकिलांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केले. न्यायालयात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.७) या प्रकरणात आरोपी महिलेला दोषी ठरवले. सहा महिने कारावासाची शिक्षा तसेच मोबदला म्हणून एक लाख ८७ हजार ५३० रुपये एवढी रक्कम आदेशाच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले. रकमेचा भरणा न केल्यास पुढे आणखी तीन महिन्यांच्या कारावासाचे आदेश दिले आहेत.