Breaking

CM Devendra Fadnavis : पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तानसाठी स्पष्ट इशारा

PM Narendra Modi warns pakistan : भारताचे ठोस व रोखठोक धोरणच जगासमोर मांडले, मुख्यमंत्र्यांचे उद्गार

Nagpur ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे ठोस धोरणच जगासमोर मांडले आहे. टेरर आणि टॉक हे सोबत होऊच शकत नाही. पंतप्रधानांच्या आजच्या भाषणामुळे पाकिस्तानला स्पष्ट संदेश गेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते नागपुरात सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दहशतवादी कृत्य करणारे व त्यांना पोसणारे सरकार यांना एकत्रितच पाहिले पाहिजे असे भारताने २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर जगातील देशांना सांगितले होते. मात्र तेव्हा ही बाब गंभीरतेने घेण्यात आली नव्हती. कसाब, डेव्हिड हेडली यांच्या बयाणांतून पाकिस्तानची भूमिका समोर आली होती, याकडेदेखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी भारताचे न्यू नॉर्मल सांगितले.कुठलीही दहशतवादी कारवाई हा भारतावरील हल्ला असेल व त्याचे

Hindi is compulsory : हिंदीची सक्ती नाही, तर मग तसा आदेश का काढत नाही ?

सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, हे पंतप्रधानांनी आज स्पष्ट केले. सोबतच भारताच कुठलेही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही असे ते म्हणाले. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे दहशतवाद्यांचे म्होरके आणि पाकिस्तानचे सरकार यांच्यात कुठलाही फरक करणार नाही असे त्यांनी सांगितले. दर वेळी पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतो आणि जगासमोर मात्र वेगळीच भूमिका मांडतो. यावेळी भारताने अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. पंतप्रधानांनी कशा प्रकारे भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन ऑपरेशन केले हे सांगितले आहे. या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे नेते घाबरले. पंतप्रधानांनी भारताचे धोरण व निर्धार जगाला सांगितले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर शक्ती व संयमाने पार पाडले. त्यासाठी सैन्यदलाचे अभिनंदनच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.