Breaking

CM Devendra Fadnavis : दिव्यांगांना रोजगाराची ‘काठी’; Unique Disability ID मिळणार

 

The government will provide employment to the disabled in the state : Youth For Jobs संस्थेसोबत राज्य शासनाचा सामंजस्य करार

Mumbai राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. त्यांचे आर्थिक स्वावलंबन होवून रोजगाराच्या संधी निर्माण करणे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगाना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देण्यासाठी पाच वर्षांत नोंदणीकृत दिव्यांगांना युडीआयडी (Unique Disability ID) देणे. त्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगाराचा आधार देण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे.

‘युथ फॉर जॉब्स’ संस्था व राज्य शासन लवकरच सामंजस्य करार करणार आहे. रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘युथ फॉर जॉब्स’ ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात शासनास सहकार्य करणार आहे. पुढे या कामाची व्यापकता वाढवून राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग युवकांना रोजगार मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी Good News!

नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे. आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे. यासाठी शासन आग्रही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’ Vikasit Bharat चे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि निर्णय घेतले आहेत, असंही ते म्हणाले.

‘युथ फॉर जॉब्स’ संस्थेच्या संस्थापिका तथा अध्यक्ष मीरा शेणॉय यांच्या संस्थेने केंद्र शासनाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनासोबत दिव्यांग युवांना रोजगार वाढीसाठी अत्यंत उत्कृष्टरित्या काम केले आहे. ज्या व्यक्ती दिव्यांग आहेत त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते. रोजगार मेळावे आयोजित करून दिव्यंगत्वाच्या प्रकारानुसार उद्योग क्षेत्रातील मागणी लक्षात घेवून आवश्यक असे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते, असं यावेळी सांगण्यात आलं.

CM Devendra Fadnavis : एमपीएससी उत्तीर्णांसाठी अखेर मुख्यमंत्र्यांचाच पुढाकार

रोजगार देणाऱ्या खाजगी संस्थांमध्ये लाईफस्टाईल इंटरनॅशनल, आदित्य बिर्ला फॅशन, रिलायन्स ट्रेंड्स, आयआयएफएल, लक्ष हॉस्पिटल, मीलन कॉफी हाऊस, एचपीसीएल, बीपीसीएल, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लोकल ऑटोमोबाईल डीलर्स, दिशा मेन पॉवर अँड सिक्युरिटी या वेगवेगळ्या खाजगी संस्था रोजगार देण्यासाठी पुढे येत आहेत, अशी माहिती देण्यात आली.