Self-protection of consumers due to Maharera Act : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nagpur गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे. विकासकांनीही सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
चिटणवीस सेंटर येथे ओमेथॉन प्रॉपटी एक्सपोचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी एक्सपोचे अध्यक्ष घनशाम ढोकणे, सचिन मेहेर, राहूल बोंद्रे, कुणाल पढोळे, अजय बोरकर, अजय केसरे, संजय महाजन उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : ऑक्सीजनला मिटर लागलं, तर आपलं काही खरं नाही !
एकाच छताखाली बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी विविध गृहनिर्माण व भुखंड याबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी अनधिकृत भुखंड खेरदीचे प्रकार होत होते. पंरतु, अधिकृतपणे खरेदी करणे यामुळे सोयीचे होणार आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करावे, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
या एक्सपोमध्ये 65 पेक्षा जास्त बिल्डर व 350 पेक्षा जास्त डेव्हलपर्सनी सहभाग घेतला आहे. नागपूर शहरातील नागरिकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पूर्व प्रकल्पामध्ये नोंदणी करणे सुलभ होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी ओमेथॉन 2 या प्रॉपटी एक्स्पोतील विविध दालनांना भेट दिली. तसेच विकासकांच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली.
Incident at Somthana : खरेदी रखडल्याने शेतकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल
नागपुरात केले लक्ष केंद्रीत
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याशिवाय अनेक छोट्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहात आहेत. २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वर्षभर नागपुरातच लक्ष केंद्रीत केले होते. त्यावेळी पहिल्या वर्षभरातील सहा महिने तर त्यांचे नागपूर आणि विदर्भातच दौरे होते. नितीन गडकरी केंद्रात मंत्री असले तरीही त्यांचा तीन दिवस नागपुरात मुक्काम असतोच. फडणवीसदेखील आठवड्यातून दोन दिवस नागपुरातच मुक्कामी दिसत आहेत.