Contractual sanitation worker : मानधन कपातीविरोधात मंत्रालयापर्यंत पायी वारी

Foot march to the ministry against honorarium cuts : कंत्राटी सफाई कामगारांचा एल्गार, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Buldhana राज्य सरकारकडून ‘कंत्राटी कामगारांचे शोषण रोखू’ अशा घोषणा केल्या जात असतानाच प्रत्यक्षात नगरपालिकांतील कंत्राटी सफाई कामगारांचे आर्थिक शोषण उघड झाले आहे. बुलढाण्यासह जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांमध्ये कार्यरत सफाई कामगारांना १८ हजार रुपये मानधन मंजूर असतानाही कंत्राटदार फक्त सहा ते सात हजार रुपयेच त्यांच्या हातावर ठेवत असल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या अन्यायाविरोधात कामगारांनी बुलढाणा–मुंबई मंत्रालय पायदळ वारी सुरू केली आहे.

सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सफाई कामगारांनी घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायासाठी पायदळ वारी करत मंत्रालयाकडे निघाले. ही वारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन थेट मागण्या मांडण्याच्या उद्देशाने आहे.

Randhir Sawarkar : शेतकऱ्यांना मोबदला देताना हयगय सहन केली जाणार नाही

कंत्राटदार कामगारांकडून १८ हजार रुपयांच्या मानधनावर स्वाक्षऱ्या घेऊन प्रत्यक्षात फक्त सहा-सात हजार रुपये देतो, असा आरोप कंत्राटी सफाई कामगार संघटनेचे नेते करण बेंडवाल यांनी केला आहे. हे केवळ शोषण नसून, शासनाच्या कंत्राटी व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी ठणकावले.

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार..!

या आंदोलनाला राजकीय वळणही मिळाले असून, भाजपचे शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे. स्थानिक स्तरावर मिळालेला पाठिंबा पाहता हे प्रकरण राज्य सरकारसमोर मोठ्या राजकीय वादळाचे रूप घेऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे.

शासन दरबारी ‘मजुरांच्या हक्कासाठी’ सुरु झालेली ही पायदळ वारी पुढे कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कंत्राटी सफाई कामगारांचा मुद्दा आता राज्य राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत.