CPRadhakrishnan : सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती!

Fadnavis Shindes presence at the oath-taking ceremony : शपथविधी सोहळ्याला फडणवीस शिंदेंची उपस्थिती

New Delhi : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी (सी.पी.) राधाकृष्णन यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती

लाल कुर्ता परिधान करून राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्रीमंडळातील मान्यवर तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील या शपथविधीला उपस्थित होते. २२ जुलै रोजी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर प्रथमच ते सार्वजनिक ठिकाणी दिसले. त्यामुळे सर्वांच्याच नजरा त्यांच्या उपस्थितीवर खिळल्या होत्या. त्यांच्या शेजारी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी देखील बसलेले दिसले.

Reservation controversy : इडब्ल्यूएसचे 10% आणि ओपनमधील 50% आरक्षण नको का?

९ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी एकूण ४५२ मते मिळवत विजय मिळवला. विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त ३०० मते मिळाली. समारंभाला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्यासोबतच राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री हजर होते. तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, झारखंडचे संतोष गंगवार आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. एनडीएच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, शुभ मुहूर्त पाहूनच हा शपथविधी सोहळा पार पडला.

Sudhir Mungantiwar : फक्त सांस्कृतिक भवनाला मंजुरी देऊन थांबतील ते मुनगंटीवार कसले !

या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सोहळ्याला अनुपस्थित होते यावरून राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत,

____