DCM helps sister Brought by chartered plane :
चार्टर्ड विमानाने आणून मुंबईतील रुग्णालयात केले दाखल
Jalgaon मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईकडे परतताना एका किडनी विकाराने ग्रस्त, लाडक्या बहिणीला मोठी मदत केली. त्या बहिणीला चार्टर्ड विमानाने मुंबईतील रुग्णालयात त्यांनी केले दाखल केले.
जळगाव जिल्ह्यातील शीतल पाटील या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल यांना तात्काळ मुंबईत पोहोचायचे होते. मात्र त्या विमानतळावर पोहोचण्याअधिच मुंबईकडे जाणारे विमान निघून गेल्याचे त्यांना समजले. मुंबईत वेळेत पोहोचणे त्यांच्यासाठी अशक्य होऊन बसले. आता आपली शस्त्रक्रिया होऊ शकेल की नाही ही चिंता त्यांना सतावू लागली. मात्र त्याचवेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगाव विमानतळावरूनच मुंबईकडे जाणार असल्याचे समजले.
DCM Eknath Shinde : गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे
पाटील यांनी आपली अडचण विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. कार्यकर्त्यांनी ही बाब मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर घातली. महाजन यांनी या महिला आणि तिच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी त्यासाठी होकार दिला. वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगाव मध्ये थांबतील पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाणार असे त्यांनी महाजन यांना सांगितले.
Mumbai Municipal Corporation : आम्ही मुंबईचे रस्ते साफ केले, तर काहींनी तिजोरी !
यानंतर सदर महिला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत घेऊन आले. प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेशी बोलून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या महिलेला रुग्णालयातही दाखल केले.
Uddhav Thackeray : ‘ते’ घरातूनच निघत नाहीत, अन् निघालेच तर थेट परदेशात जातात !
उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच गरजूंच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय अनेकांना आला आहे. विमान चुकलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला धावून जात त्यांनी पुन्हा मदतीसाठी पुढाकार घेण्याचा स्वभाव या कृतीतून दाखवून दिला अशी प्रतिक्रिया जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
#Dcm eknath shinde #eknath shinde #chartered plane #DCM helps sister #muktainagar #Jalgaon news #Kidney disorders #उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे #एकनाथ शिंदे
#चार्टर्ड विमान #बहिणीला मदत #मुक्ताईनगर #जळगाव बातम्या #किडनी विकार