Breaking

Demands of the disabled : दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन..

 

Disabled people are aggressive in Sindkhedraja of Buldhana District : सिंदखेडराजात दिव्यांग आक्रमक, शासनाच्या भूमिकेचा केला निषेध

Buldhana : दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांच्या मंजुरीसाठी शेतकरी नेते कैलास मेहेत्रे आणि त्यांच्या समर्थकांनी २४ मार्च रोजी सिंदखेडराजातील राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यापासून तहसील कार्यालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा काढला. तहसीलदार अजित दिवटे यांना दिलेल्या निवेदनात दिव्यांगांच्या प्रबंलित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आहे.

दिव्यांगांचे अपंग वित्त विकास महामंडळाचे कर्ज प्रकरण निकाली काढणे, दिव्यांगांना दरमहा ६,००० रुपये मानधन देणे, शासन निर्णयांमध्ये विशेष सवलती देणे, व्यापारी गाळ्यांचे भाडे देणे आणि अंत्योदय कार्ड कॅम्प आयोजित करणे यांसारख्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण ने केल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Vijay Wadettiwar : राजकारण आणि धर्म वेगळा रहावा, यावर डॉ. बाबासाहेबांचा जोर होता !

यावेळी सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगांना मासिक वेतनात वाढ करून ६,००० रुपये महिना मिळावा, घरकुल योजनेत १००% अनुदानाचा लाभ द्यावा, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची व्यवस्था करावी, कर्ज प्रकरणांमध्ये शासकीय नोकरदार जामीनदार असावा, ही अट रद्द करावी, व्यवसायाकरिता जागा मिळावी, आमदार-खासदार निधीतून ५ लाख रुपये दिव्यांग कल्याणासाठी खर्च करावेत आणि संगणक प्रशिक्षणाद्वारे रोजगार निर्मिती करावी, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule : आमदारांना यशस्वी करावा लागेल ‘जीवंत सातबारा’!

या आंदोलनात दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेचे उद्धव पाखरे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते कैलास मेहेत्रे, तसेच रवी लाखे, के. बी. भाट, विजय तायडे, राजू ठाकरे, शेषराव ठाकरे यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. दिव्यांग मंत्रालयाचा काहीही उपयोग होत नसल्याचा आरोपही दिव्यांग बांधवांनी यावेळी केला.