Chief Minister reminisces about childhood memories : म्हणाले, आम्ही बैलगाडीने सोमनाथला जायचो
Anandvan Warora Chandrapur : थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन प्रकल्पाला आज ७५ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. अध्यक्षीय भाषण करता मुख्यमंत्री आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमले. बाबांच्या सोमनाथ प्रकल्पाच्या भेटीची गोष्ट त्यांनी यावेळी सांगितली.
लहानपणी आम्ही आमच्या गावाहून बैलगाडीने सोमनाथला जायचो. तेथे प्राणी बघून, खेळून, जेवण आटोपून दुपारनंतर आमटे फार्मला जायचो. तेथे काही वेळ घालवल्यानंतर चहापाणी घेतल्यानंतर बैलगाडीने परत गावी जायचो. खूप रम्य होते ते दिवस, ही आठवण सांगताना मुख्यमंत्र्यांनी कौस्तुभ आमटे यांच्या मागणीचीही दखल घेतली. ते म्हणाले, कौस्तुभ यांची मागणी योग्य आहे. सोमनाथमध्ये जो काही बदल त्यांनी सुचवला आहे, तो निश्चितपणे घडवून आणू. त्यासाठी त्यांनी सरकारला पत्र द्यावे. प्राथमिकतेने ते काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Bachhu Kadu : बच्चू कडू यांची आमदारकी गेली, आता जिल्हा बँकेचे अध्यक्षपदीही संकटात!
व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आदीवासी कल्याण मंत्री अशोक उईके, माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोऱ्याचे आमदार करण देवतळे, वणीचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, हेमंत पांडे, मिनाक्षी गुप्ता, CA रचना रानडे, डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, कौस्तुभ आमटे आणि आनंदवन परिवारजन उपस्थित होते.
राम नाईकांमुळे झाले बरेचसे निर्णय..
समाजात जे काही सकारात्मक काम होतं, त्या कामाच्या पाठीमागे उभे राहणे ही सरकारची भूमिका असली पाहीजे आणि आमची तीच भूमिका आहे. कुष्टरोग्यांसाठी राम नाईकांनीही मोठे काम केले आहे. बरेचसे निर्णय रामभाऊंमुळे झालेले आहेत.
सरकारच्या धोरणांचा फटका..
सरकारच्या वेळोवेळी बदललेल्या धोरणांचा फटकाही या प्रकल्पाला अनेक वेळा बसला आहे. या सगळ्या वादळात विचलीत न होता आनंदवन परिवाराने काम पुढे नेले, हे महत्वाचं आहे. हजारो लोक जुळत गेले. असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्यांना या प्रकल्पाने आपलसं केलं नाही. मुलभूत सेवा काय असते, हे समजून घेण्यासाठी येथे यावं लागेल. एकत्र कुटुंब पद्धती येथे बघायला मिळते.
मोदींचे टास्क..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा टास्क दिलेला आहे. आपल्याला कुष्ठरोगमुक्त देश तयार करायचा आहे. त्यासाठी सरकारने कामही सुरू केले आहे. पण हे काम केवळ सरकारच्या भरोशावर होणार नाही. तर आनंदवनसारख्या संस्थांमुळे हे काम करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त सेवाभावी संस्थांना जोडून या कामाला मूर्त रूप देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Devendra Fadanvis : मुलभूत सेवा काय असते, हे समजून घेण्यासाठी आनंदवनलाच यावं लागेल !
आनंदवनचा निधी वाढवला..
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विभाग येथे स्कील डेव्हलपमेंट सेंटर तयार करत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. याशिवाय निवासी ५०० लोकांचे सेंटर उभारण्याचे सुतोवाच त्यांनी केले. सरकारकडून जे अनुदान देतो ते २०१२ सालानंतर बदललेलं नाही. अनुदानामध्ये रुग्णालय २२०० रुपये प्रतीरुग्ण देत होतो. ते आता ६००० देऊ. पुनर्वसन २००० रुपये देत होतो ते वाढवून आता ६००० रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
डॉ. विकास आमटेंची चिंता..
डॉ. विकास आमटेंना चिंता आहे की, हे कार्य पुढे चालणार की नाही. पण हा जगन्नाथाचा रथ आहे. बाबांनी सुरूवात केली आणि आताही अनेक हात हा रथ ओढायला लागणार आहेत. ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ७५ कोटी रुपयांची निधी सरकारने द्यावा, अशी मागणी डॉ. कौस्तुभ आमटेंनी केली. त्यावर १० कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. उरलेले ६५ कोटी कुठून आणायचे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.