Breaking

Dhananjay Munde : विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आ. धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल

Girls molested in coaching class, politics heats up in Beed : कोचिंग क्लासमध्ये मुलींचा विनयभंग, बीडमध्ये राजकारण तापले

Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तापलेले बीडचे राजकारण, कोचिंग क्लास मध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटनेने पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. खासगी क्लासमध्ये विनयभंग झाल्याची घटना समोर आल्यावर. बीड बंदची हाक देण्यात आली होती. अरुण आरोपींवर कठोर कारवाई ची मागणी होत असताना. आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात आ. संदीप क्षीरसागरांवर आरोप केले. यातच आता त्या आरोपीं शिक्षकांसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो व्हायरल होत असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे असं बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट केले आहे. याच प्रकरणात आ. धनंजय मुंडे यांनी आ. संदीप क्षीरसागरांवर आरोप केले. परंतु आरोप करणे सोपे आहे ते सिद्ध होणे गरजेचे आहे‌. अशी प्रतिक्रिया खा. सोनवणे यांनी दिली.

Hindi controversy ; मराठी अस्मिता, विरोधकांची एकजूट, निवडणुकांमुळे सरकारने घेतला ‘यु टर्न’!

विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीड मधील राजकारण तापले असून आ. धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप सोनवणे यांनी फेटाळून लावले. सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत, असे स्पष्ट केले होते.

Hindi language controversy : हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला; तरीही ठाकरे बंधू एकत्र येणारच!

संतोष देशमुख खून प्रकरणात जे बोलत होते, ते विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात गप्प का? त्यांना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना आज खासदार बजरंग सोनवणे यांनी आम्हाला लाज वाटली म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो होतो. मात्र जे चार दिवसांनी बोलले, त्यांनाच लाज वाटली की नाही हे मला कळालं असा टोला सोनवणे यांनी लगावला.

Amravati University : पश्चिम विदर्भाच्या प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास होणार

बीड शहरातील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक क्षीरसागर आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली‌. दरम्यान आज बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आरोपी विजय पवार याचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

____