Breaking

Dr. Amol Kolhe : विकास म्हणजे नांगर फिरवणे नव्हे!

 

Development is not about turning the plow : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Buldhana “विकास” या शब्दामागे लपलेल्या राजकारणावर सडेतोड भाष्य करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांच्या उद्योगपतीप्रेमावर जोरदार टीका केली. बळीराजाला वाऱ्यावर सोडून अब्जावधींची कर्जमाफी मोजक्या उद्योगपतींना देणं म्हणजेच आजच्या सत्ताधाऱ्यांचा ‘विकास’ आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

येथील स्वातंत्र्य मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित वैचारिक व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती क्रांती सेवा संघाने केले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, भास्करराव काळे, राजश्री जाधव, डॉ. दीपिका रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : ‘हेलिकॉप्टर शॉट लावतो’, म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना बावनकुळेंचा दणका !

उद्योगपतींची कर्जमाफी, बळीराजाला फसवणूक!
डॉ. कोल्हे म्हणाले, “गेल्या ११ वर्षांत बळीराजाला केवळ ८ लाख कोटींचे अनुदान देण्यात आले, तर त्याच काळात १६ लाख कोटींची कर्जमाफी काही उद्योगपतींना मिळाली. हीच का विकासाची परिभाषा?” सत्तेत येईपर्यंत कर्जमाफीच्या आश्वासनांनी शेतकऱ्यांना फसवणारे आता त्यांच्याकडे पाठ फिरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, ‘रक्त सांडवायची वेळ येऊ देऊ नका’

“जयंती उत्सवांना वैचारिक अधिष्ठान आवश्यक”
महापुरुषांची जयंती रोषणाई व डीजेच्या गोंगाटात साजरी करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी यावेळी केले. “महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचले तरच खरे राष्ट्रनिर्माण होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मेहकरमध्ये वैचारिक कार्यक्रमांची जी सुरूवात झाली आहे, ती भविष्यात एक प्रेरणादायी चळवळ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर पवार यांनी केले तर आभार जया बळी यांनी मानले.