Minister ordered the inquiry of JalJeevan mission : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे चौकशीचे आदेश
Wardha प्रत्येक गावातील कुटुंबाला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी देशपातळीवर जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. परंतु, या योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सेलू तालुक्यातील बऱ्याचशा गावांतील कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्याचबरोबर काही कामांमध्ये त्रुट्या आढळून आल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सेलू तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची तालुकास्तरीय समिती गठित करावी. त्यानंतर पाहणी करावी व अहवाल सादर करावा, अशा सूचना गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ९ जानेवारी रोजी सेलू तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठकीत केल्या.
पंचायत समिती सेलूच्या सभागृहात तालुक्यातील पाणीटंचाईबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मुडे, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा डेकाटे आदी उपस्थित होते. सदर कामाची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात येणाऱ्या समितीत अशासकीय सदस्याची सुध्दा नियुक्ती करावी.
Nagpur Improvement Trust : काय सांगता? नासुप्रची इमारत पाडणार ?
समितीमार्फत जलजीवन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करुन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून त्रुटी आढळलेल्या कामाची चौकशी करावी व तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना भोयर यांनी केल्या. सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठ्याची कामे जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आली होती. या कामातील अनेक कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत.
तसेच झालेल्या कामातील पाईपलाईनमध्ये त्रुट्या आढळून आल्या असून, पाईप लिकेज असल्याचे सुध्दा आढळून आले. त्यामुळे गावातील नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाईप लिकेज असल्यामुळे काही नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी माजी सरपंचांनी मंत्री भोयर यांच्यासमोर मांडल्या. त्यामुळे तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाणीपुरवठा विभागाला केल्या.
Beed incident impact : जिल्ह्यात गावगाडा थांबला; सरपंच, सदस्यांचे कामबंद आंदोलन !
ज्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे घेण्यात आलेली नाहीत, त्या गावातील कामे पाणीटंचाई आराखड्यात घेण्यात यावीत. गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करुन द्यावे, हे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंब पिण्याच्या व वापराच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना यावेळी मंत्री भोयर यांनी दिल्या.