Unity in Diversity: Triple Ideological Confluence on NCP Stage : पोलिस आयुक्तांनी दिला नशा मुक्तीचा बुलंद संदेश
Nagpur : काल २ ऑक्टोबर.. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे सामाजिक एकता आणि मानवी मुल्यांचा संदेश, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि सत्य-अहिंसेचे प्रतिक आणि विजयादशमी म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय हा त्रिवेणी संगम राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) व्यासपीठावर साधला गेला. या त्रिवेणी संगमामुळे हा महोत्सव केवळ धार्मीक न राहता, सामाजिक प्रबोधनाचा प्रेरणास्त्रोत ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर आणि ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने हा दसरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पोलिस आयुक्तांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या रावण दहनाच्या समारंभासाठी नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल आले होते. त्यांनी रावणाच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर समाजातील वाईट सवयींचे दहन करण्याचे आवाहन केले. तरुण पिढीला उद्देशून त्यांनी नशा मुक्तीचा संदेश दिला आणि समाजातील प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
Ladki Bahin Yojana : लिहून ठेवा.. लाडकी बहीण योजना बंद होणार !
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भीम गितांच्या कार्यक्रमाचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने दसऱ्याच्या उत्साहात आणखी भर पडली. कार्यक्रमाला शहराध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजन नागपूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, तानाजी वनवे, मालू वनवे आणि विजय वनवे यांनी केले होते. यावेळी महिला अध्यक्ष सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर यांच्यासह प्रदेशचे पदाधिकारी, शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.