Breaking

Eknath Shinde : मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे चेहरे समोर आले !

Deputy Chief Minister Eknath Shinde’s harsh criticism of Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका

Mumbai : निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने समोर आले, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उबाठाची दुटप्पी भूमिका दिसली, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, सोयीचे राजकारण करणारे लोक वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबध नाही, असं जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतात ते करतात, हे पाहावे लागेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde Shivsena : कुणाल कामरावर फक्त गुन्हा नको, अटक करा!

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेने यापूर्वीच स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली आहे. आम्ही कधीही मतांसाठी सोयीचे राजकारण केले नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

काही मुठभर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुसलमानांसाठी शाळा, रुग्णालये झाली पाहिजेत. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या विधेयकामुळे मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल. या विधेयकाचे मुस्लिम समाजानेही स्वागत करायला हवे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील छत्रपतींच्या आदर्शावर देशाचे नेतृत्व करत आहेत. इथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Rahul Narvekar : ..तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला गालबोट लागेल !

१०० दिवसांत ८५ टक्के कामे पूर्ण करणार
महायुती सरकारने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. २६ विभागांचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी ही संकल्पाना गांभीर्याने घेतल्याचे दिसले. यातील ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. २५ टक्के कामे प्रगतीपथावर आहेत. १०० दिवसांत ८५ टक्के कामे पूर्ण होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

१०० दिवसांतील कामांना गती मिळाली आणि संकल्पनेनुसार अधिकारी वर्गाने काम केले. प्रत्येक विभागाची कार्यक्षमता यातून दिसली. मागील अडीच वर्षात महायुती सरकारने जे काम केले त्याच वेगाने आता यापुढेही काम होईल, आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो दुप्पट चौप्पट वेगाने पुढे जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.