Shinde Sena focusing on 500 seats for local elections : ५०० जागांवर लक्ष; बुथ आणि मतदारांवर विषेष फोकस
Buldhana राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राजकीय रंग चढू लागला असतानाच, शिंदेसेनेने बुलढाण्यात ताकदीची संघटनात्मक बैठक घेत भाजपसोबत युतीची रणनीती अधिक धारदार करण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जुलै रोजी ही बैठक पार पडली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगर परिषदांतील एकूण सुमारे ५०० जागांवर लक्ष केंद्रित करत बहुसंख्य जागा मिळवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
MLA Sanjay Gaikwad : लातूरला मारका बैल दिला, गायकवाडांवर राजकीय कोटी!
बैठकीस शिंदेसेनेचे राष्ट्रीय सचिव व निवडणूक निरीक्षक कॅप्टन अभिजित अडसूळ, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, मृत्युंजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, महिला आघाडी प्रमुख माया म्हस्के आदींसह विविध जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून, बुथस्तरावर संपर्कजाळे उभे करण्याचे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले. प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क वाढवण्यावर भर देत, मतदारांशी थेट संवाद साधण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णय झाला.
Collector of Amravati : गरज भासल्यास तडीपारीची कारवाई करू, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितले
“संघटनात्मक बळ, स्पष्ट नेतृत्व, आणि grassroots संपर्क हेच यशाचे सूत्र,” असा ठाम विश्वास बैठकीत मांडण्यात आला. ,,
जास्तीत जास्त जागांवर विजयासाठी भक्कम उमेदवारांची निवड, स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार रणनीती, बूथस्तरावर कार्यकर्त्यांचे सक्रिय जाळे, सोशल मीडिया, घरभेटी आणि मेळावे यांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद, प्रचार मोहिमांचे नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आदींवर भर देण्यात आला.