Shindesena trying to enter in stronghold of Patel and Patole : चंद्रिकापूरेंच्या प्रवेशानंतर आणखी दोन माजी आमदार वाटेवर
Gondia जिल्ह्यातील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल prafull Patel व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्याभाेवती केंद्रित आहे. या दोन्ही नेत्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गड तयार केला आहे. पण, आता या गडाला भेदण्यासाठी शिंदेसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. पुन्हा दोन माजी आमदार प्रवेशाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शिंदेसेना या माध्यमातून पटेल, पटोले यांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलले. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी दिली.
Manikrao kokate : कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर भडकली वंचित !
त्यामुळे चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविली होती. पण, प्रहार पक्षात ते फार काळ रमणार नाहीत, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. लवकरच ते पुत्रासह शिंदेसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा होती. त्या चर्चेला गुरुवारी त्यांच्या शिंदेसेनेत प्रवेशानंतर पूर्णविराम लागला आहे.
चंद्रिकापुरे यांच्याप्रमाणेच दोन माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश सोहळा देवरी येथे २० फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती आहे. यावेळी एक माजी आमदार पुत्र सुद्धा धनुष्यबाण हाती घेणार आहे. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नेत्यांची संख्या बरीच आहे. यांपैकी काहींना गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून केला जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी तीन माजी आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश करून त्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या गळाला पुन्हा नेमके कोण-कोण लागतात, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
PM Kisan, Namo Kisan scheme : सरकारी योजनांतून शेतकऱ्यांना वर्षभरात २३२ कोटी
जिल्ह्यात शिंदेसेनेचा एकही आमदार नसल्याने ती फारशी प्रभावी नाही. त्यामुळेच आता प्रभाव वाढविण्यासाठी तीन माजी आमदार आणि दोन माजी आमदार पुत्रांचा प्रवेश करवून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शिंदेसेनेची मोर्चेबांधणी करून ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एका माजी आमदार पुत्राने विधान परिषदेवर वर्णी लागावी, यासाठी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याला शिंदेसेनेकडून हिरवी झेंडी मिळाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील आणखी काही बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी एका युवा नेत्यावर जवाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपची शिवसेनेवर नजर..
राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदेसेना या तिघांचे मिळून महायुतीचे सरकार आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे. तर, शिंदेसेनेने पक्षाचा विस्तार वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शिंदेसेनेकडून जिल्ह्यात सुरू असलेल्या हालचालींवर भाजपचीसुद्धा बारीक नजर आहे.