The situation will worsen if farmers lose patience : आत्महत्यांचे सत्र सुरूच, तरीही सरकारकडून मदत नाही.
Nagpur : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्त थांबता थांबत नाहीये. रोज कुठे ना कुठून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी येते. काही वर्षांपूर्वी तर या आत्महत्यांच्या बातम्या वृत्तपत्रांत रकानेच्या रकाने भरून दिल्या जायच्या. मात्र हळूहळू ती जागा कमी होत गेली. आता तर परिस्थिती अशी आहे की, बातमीचे गांभीर्य न छापण्यांना राहिले न वाचणाऱ्यांना. इतका हा आकडा मोठा होत चालला आहे. पण शेतकऱ्यांचा अधिक अंत सरकारने पाहू नये. कारण शेतकऱ्यांनी नांगर सोडून जर मशाली हाती घेतल्या. तर काय – काय जाळतील, याचा नेम नाही.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते रविकांत तुपकर सरसावले आहेत. राज्यभर एल्गार मेळावे घेत आहेत. इकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आक्रमक नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचं अधिक काही मागणं नाही. फक्त सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पाळावे, एवढी रास्त मागणी आहे. आम्ही आमच्याकडून काही मागत नाही. पण कर्जमाफीचे तुम्हीच दिलेले वचन तरी पाळा, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत.
NCP Rohini Khadse : महिला आयोग नव्हे, रुपाली चाकणकरांचा धमकी आयोग !
कर्जमाफी आणि पीक विम्याची रक्कम या दोनच प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहे. पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीये. भाजपचे नेते म्हणतात ‘रस्त्यांसाठी जमीन द्या, रस्त्यांसाठी पैशांची काही कमी नाही..’ या जमिनीही शेतकऱ्यांच्याच आहेत. मग शेतकऱ्यांसाठीच पैसा कमी पडतो आहे का, हा प्रश्न आहे. काही रस्ते सध्या राहू द्या अन् शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असे म्हणणे गैर नाही. आता आत्महत्यांचा आकडा फुगत चालला आहे. अशा परिस्थितीत तरी सरकारने कर्जमाफी आणि पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि आत्महत्या थांबवल्या पाहिजे.
Nagpur District BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष लागले कामाला, कार्यकर्त्यांनाही दिल्या सूचना
शेतकऱ्यांना पुराने झालेल्या नुकसानाच्या भरपाईचे पैसे मिळाले नाहीत. पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. कष्टाने पिकवलेल्या सोयाबीन, कापसाला भाव मिळाला नाही. खरं पाहता या परिस्थिती शेतकऱ्यांना सरकारकडून अतिरिक्त मदतीची गरज आहे. पण नका देऊ अतिरिक्त मदत. निदान तुम्हीच दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन तरी पाळा, येवढच गरीब शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.