Breaking

Fire in Malkapur : जिनिंग अँड प्रेसिंगला भीषण आग !

Ginning and pressing fire costs in lakhs : मलकापुरातील घटनेत लाखोंचे नुकसान

Khamgao मलकापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या मातोश्री जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीमुळे जिनिंगमध्ये साठवलेला कवडी, सरकी आणि रुईचा मोठा साठा जळून खाक झाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.

घटनास्थळी असलेल्या कामगारांनी अचानक आगीचा भडका पाहताच जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. हवा वेगवान असल्याने आग काही क्षणांतच जिनिंगच्या मोठ्या भागात पसरली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर आणि खामगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Harshawardhan Sapkal : सपकाळांची नियुक्ती, काँग्रेस नेत्याचा सर्व पदांचा राजीनामा

सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कवडी, सरकी आणि रुईसह लाखोंचा माल जळून खाक झाला. या दुर्घटनेमुळे जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली, तरी शेजारी साठवलेल्या कापसाच्या गठाणींना कोणतीही हानी पोहोचली नाही. आग वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठे नुकसान टळले.

या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे मलकापूर औद्योगिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले असून, आगीच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे.

Forest Department : एक वर्षाच्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान!

तर नुकसान वाचू शकले असते
आग विझविण्यासाठी नियंत्रण दलाने कसोशीने प्रयत्न केले. पण तरीही त्यांना यश येऊ शकले नाही. आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली होती, की दोन तास फक्त प्रयत्न सुरू होते. सुदैवाने जीवित हानी टळली. पण आग लवकर विझली असती तर लाखोंचे नुकसान झाले नसते.