Possibility of large amount of fungus in the Bhagar : काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
Nagpur महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात अनेक भाविक विविध व्रत व उपास करतात. उपवासाच्या निमित्ताने जे अन्नपदार्थ घेतले जातात ते आरोग्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत की नाही याची खातरजमा न करता जे उपलब्ध आहे तसे साहित्य लोक घेतात. यात भगर मध्ये मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यात विषद्रव्य तयार होतात. 32 डिग्रीपर्यंतचे तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने अशी भगर जर खाण्यात आली तर मोठ्या प्रमाणात विषबाधेची शक्यता असते. त्यामुळे पदार्थ घेताना काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
भगर, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ यात बुरशीजन्य जंतूंची शक्यता नाकारता येत नाही. हे पदार्थ दुकानातून घेताना तपासून घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे. बाजारातून भगर, सिंगाडा पीठ राजगिरा पीठ इत्यादी आणल्यानंतर ते व्यवस्थित निवडून स्वच्छ करणे आवश्यक आहे. विशेषता पाकीट बंद असलेले पदार्थ हे अधिक सुरक्षित समजले जातात.
Koteshwar Wardha : हेमाडपंथी कोटेश्वर मंदिर आकर्षणाचे केंद्र!
पाकीट बंद पदार्थ घेताना जर लेबल नसलेली पाकिटे अथवा ती कुठल्या बाजूने फुटलेली असल्यास घेऊ नयेत. याचबरोबर खुली भगर सिंगाडा पीठ राजगिरा पीठ हे घेणे टाळावे. पाकिटावर देण्यात आलेले दिनांक व त्यावर नोंदविलेला अंतिम वापर दिनांक ग्राहकांनी आवर्जून तपासला पाहिजे. भगर साठविताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी साठवावी विशेषता झाकण बंद डब्यात ठेवणे आवश्यक आहे.
जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नये किंवा तसे भगरीचे पीठ विकत आणू नये. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे या पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते हे लक्षात घेतले पाहिजे, असे विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार
विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीनुसार लेबल वर्णन असलेले पॅकेट बंद भगर, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ याचीच विक्री करावी. खरेदी करताना घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी. या पदार्थांच्या पॅकेटवर पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्रमांक, त्याची पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. मुदत बाह्य अन्नपदार्थाची विक्री करू नये अशा स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या आहेत.